दूध उत्पादकांना कात्रज दूध संघ देणार 5.16 कोटी

0

पुणे । पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (कात्रज दूध) सुमारे 50 हजार शेतकर्‍यांना प्रती लिटर 70 पैसे याप्रमाणे दरफरकाची रक्कम देण्याचा निर्णय संघाच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण घेण्यात आला. संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी हा निर्णय जाहीर करत दिवाळीपूर्वी रक्कम दूध उत्पादकांच्या खात्यात वर्ग करणार असल्याचे सांगितले.

या निर्णयाचे दूधउत्पादकांनी स्वागत केले आहे. संघाचे अध्यक्ष हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वसाधारण सभा झाली. यावेळी संचालक रामचंद्र ठोंबरे, गोपाळ म्हस्के, लक्ष्मण तिटकारे उपस्थित होते. संघाला यंदा 2.37 कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे दूध संस्थांना त्यांच्या भागभांडवलावर 10 टक्के लाभांश देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. तसेच चाफ कटर, कुट्टी मशीन, स्टेनलेस स्टीलचे कॅन यावरील अनुदानापोटी संघाने 1 कोटी खर्च केल्याचेही हिंगे यांनी सांगितले. डॉ. विवेक क्षीरसागर यांनी प्रास्ताविक तर वैशालीताई गोपाळघरे यांनी आभार मानले.