आज चाळीसगाव तालुक्यात ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांच्या भेटीगाठी झाल्या. विशेषता दूध उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पशुधन चाळीसगाव तालुक्यात आहे. अंदाजे चारलाख पशू आहेत. त्यात दुभते जनाचारांची संख्या सर्वाधिक आहे.
तालुक्यात दुष्काळाच सावट आहे. अनेकाना दूध हाच आधार आहे. यंदा दुष्काळ मुळे चारा तसेच ढेप , मका चुर चे दर कमालीचे वाढले आहेत. पण दुधाचे दर स्थिर आहेत. मका ढेप खाऊ घातली नाही तर फॅट मिळत नाही. परिणामी दूधाला भाव मिळत नाही.
माझी जळगाव दूध संघाला विनंत्ती आहे. राज्य दूध फेडरेशनची वाट न पाहता दुधाचा दर दोन रुपयांनी वाढवून द्यावा. मला आठवतं आम. आबासाहेब चिमणराव पाटील दूध संघाचे चेअरमन असताना राज्यात ऐतिहासिक निर्णय जळगाव दूध संघाने घेतला होता. संघाने स्वतःच्या ताकदीवर दोन रुपये दर वाढवला होता.
संघ हा शेतकऱ्यांच्या आहे. तो शेतकऱ्यांच्या अडचणीत त्यांच्या पाठीशी उभा राहावा. जर शेतकऱ्यांच्या संस्था शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभी राहणार नसेल तर अशा संस्था काय कामाच्या?
शेतकऱ्यांना दोन रुपये वाढवून देत असताना ते दोन रुपये ग्राहकांकडून वसूल करू नका.
सत्तेत आपण सर्व शेतकरी पुत्र आहोत . व्यापारी निर्णयाची अपेक्षा नाही.
जनता आपल्या निर्णयाची वाट पाहत आहे.
आपला
प्रफुल्ल साळुंखे
चाळीसगाव विकास मंच