‘दृश्यम’ फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन 

0

हैद्राबाद:  ‘दृश्यम’ ‘डोंबिवली फास्ट’, या चित्रपटाचे दिग्दर्शक निशिकांत कामतचे यांचे हैदराबाद येथे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली होती,  त्याच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अखेर त्यांचे आज सोमवारी १७ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर पुन्हा शोककळा पसरली आहे. यावर्षी  हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांचे निधन झाले आहे. ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर, इम्रान खान, सुशांत सिंह राजपूत यांचे यावर्षी निधन झाल्याने बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे, त्यातच आज दृश्यम चित्रपटाचे दिग्दर्शक निशिकांत कामात यांचे निधन झाल्याने त्यात भर पडली आहे. निशिकांत कामतला यकृताशी संबंधित आजारामुळे त्रास होत होता आणि त्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते.

निशिकांत कामतने ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला. २००६ मधील मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील ‘मुंबई मेरी जान’ या चित्रपटाचेही त्याने दिग्दर्शन केले. त्यानंतर निशिकांत कामतने ‘दृश्यम’, ‘मदारी’, ‘फुगे’ यासारख्या चित्रपटांचे सुद्धा दिग्दर्शन केले होते. याशिवाय, ‘सातच्या आत घरात’, ‘रॉकी हॅण्डसम’, ‘जुली 2’, ‘मदारी’, ‘भावेश जोशी’ या सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात निशिकांत कामतने अभिनय केला होता. आगामी ‘दरबार’ या चित्रपटासाठी तो काम करत होता.