देऊळगांवगुजरीला सिलेंडरचा स्फोट, 4 लाखांचे नुकसान

0

देऊळगावगुजरी – जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे होऊन संजय वैधनाथ जटाळे यांच्या दुकानात ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट होऊन दुकानासह आजुबाजूंच्या घरांचे सुमारे 4 लाखांपर्यंत नुकसान झाल्याची घटना आज पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. स्फोट भिषण असल्याने अनेक घरांची पत्रे फाटली. भरवस्तीत झालेल्या या घटनेमुळे देऊळगाव हादरून गेले. सुदैवाने जीवीत हानी टळली. संजय जटाळे यांचा साहित्य स्टेशनरी कटलरी व जनरल स्टोअर्स असून त्या बाजूलाच त्यांचा रहिवास आहे. त्यांच्याकडे असलेल्या इंडेन गॅस एजन्सीचे दुसरे सिलेंडर त्यांनी बाजुच्या दुकानात ठेवलेले होते. आज सकाळी पावणे चार वाजेच्या सुमारा अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडरचे सील शाबूत असतानाही ते मधोमध फाटून स्फोट झाल्याचा हा प्रकार समोर आला आहे. स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने शटरच्या चिंधड्या होऊन जागेसमोरील घराची भिंत, जागचा दर्शनी भाग कोसळला. शिवाय आजूबाजूच्या अनेक घरांवरील पत्रे फाटली. घटनेची माहिती मिळताच तलाठी खोडवे, यांनी व फत्तेपूर पोलिसांनी पंचनामा केला.