जळगाव । ढोल-ताशांचा गजर, पारंपारिक साहसी खेळांची चित्तथरारक प्रात्याक्षीके, आकर्षक फुलांनी सजविलेले रथ आणि ’शिवाजी महाराज की जय’चा जयघोष. अशा उत्साहपुर्ण वातावरणात रविवारी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची 387 वी जयंती साजरी झाली. जयंती निमित्त शहरात विविध संघटना, संस्था, शाळा, महाविद्यालय, पक्षांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठ वसतीगृहापासून प्रशासकीय इमारतीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यानंतर सिनेट हॉलमध्ये शिवचरित्राचे अभ्यासक प्रा.सचिन गरुड यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
मूळजी जेठा महाविद्यालय
प्रत्येक राजकीय पक्ष, संघटना यांनी शिवाजी महाराजांचा सोयीचा आणि एकांगी इतिहास तरुणांसमोर मांडला. त्यांचे दैवीकरण केले. धर्मासाठी लढणारा शिवाजी अशी त्यांची संकुचित प्रतिमा उभी करून त्यांच्या कार्याला मर्यादित केले असे मत डॉ.जुगलकिशोर दुबे यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मू.जे. महाविद्यालयात आयोजित केलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते. मध्ययुगीन काळातील राजकीय,सामाजिक, धार्मिक परिप्रेक्ष्यातून शिवाजी महाराजांकडे पाहण्याची गरज आहे. त्यांचा वास्तववादी इतिहास समजून घेण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. आजच्या राजकीय धुरीणांनी महाराजांच्या काही गुणांचा अवलंब केल्यास आज निर्माण झालेला कल्याणकारी राज्याचा गोंधळ टाळता येऊ शकतो असे ते म्हणाले. प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. पाश्चात्य इतिहासकारांनी मांडलेला शिवाजी समजून घेतला पाहिजे. त्यांच्या लोककल्याणकारी कार्याची प्रेरणा घेऊन तरुणानी काम केले पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यामधून तुषार सूर्यवंशी याने आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.योगेश महाले यांनी केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
जात, धर्म, अन्यायाच्या विरोधाची परंपरा जपा
जात, धर्म आणि अन्यायाच्या विरुध्द लढण्याची शिवरायांनी दिलेली परंपरा आजच्या तरुणांनी पुढे सुरु ठेवावी,असे आवाहन शिवचरित्राचे अभ्यासक प्रा.सचिन गरुड यांनी केले. ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात रविवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ‘शिवचरित्राचे नवे आकलन’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. बीसीयुडी संचालक प्रा.पी.पी.माहुलीकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून पी.ई.तात्या उपस्थित होते. यावेळी मंचावर प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा.अनिल डोंगरे, विभागप्रमुख डॉ.तुकाराम दौड तसेच शिवरायांच्या वेशभूषेत हिरेन खत्री, जिजाऊंच्या वेशभूषेत स्वाती तळेले हे दोघे विद्यार्थी उपस्थित होते.
शिवजयंती समितीतर्फे अभिवादन
राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज (दि.19) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमास माजीमंत्री सुरेशदादा जैन, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, करीम सालार, गफार मलिक, मुकूंद सपकाळे, शंभूअण्णा पाटील यांच्यासह शिव जयंती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम संयोजन ना. महाजन यांच्या आरोग्य सेवेचे समन्वयक अरविंद देशमुख यांनी केले. ना. महाजनजन संपर्क कार्यालयातर्फे शिव मिरवणुकीतील कार्यकर्त्यांना अल्पोपहार व पाणी वाटप करण्यात आले.
शिवरायांचे कार्य बोलते !
प्रा.गरुड म्हणाले की, शिवरायांसोबत विविध जाती, धर्माचे लोक होते. त्यांनी कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही. मिर महंमद या चित्रकाराने शिवरायांचे पहिले चित्र काढले. व्यक्तीगत आणि सामुदायिक पातळीवर शिवरायांचे कार्य बोलते. त्यांनी स्त्रीयांच्या नावे जमीनी केल्या, पहिले प्रिंटींग मशिन आणले, समुद्रात आरमार उभे केले, विजात-जमातवाद्यांच्या कैदेतून शिवराय आजही सुटलेली नाहीत. शिवरायांचे अनुयायी होण्यासाठी स्वत:मध्ये तरुणांनी बदल करण्याचे आवाहन केले. विचारधारा प्रशाळेचे संचालक डॉ.अनिल डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिवरायांच्या लेख व कवितांच्या पुस्तिकेचे विमोचन पाहूण्यांच्या हस्ते करण्यात आले. सुत्रसंचालन प्रा.भारत कडबे यांनी केले. विभागप्रमुख डॉ.तुकाराम दौड यांनी आभार मानले.
भारतीय जनता पार्टी मंडल क्रमांक 1
भारतीय जनता पार्टी मंडल क्रमांक 1 शिवाजीनगर परिसरतर्फे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मार्ल्यापण करण्यात आले. याप्रसंगी भाजपा महानगर उपाध्यक्ष सुभाष सौचे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, मंडल अध्यक्ष राजू मराठे, ज्योतीताई राजपूत, प्रभाकर तायडे, संजय शिंदे, रमेश जोगी, सुशिल भावसार, दिपक तायडे, निलेश पवार, गणेश माळी, विनय निंबाळकर, उमेश मोघे, सुरेश मिस्तरी, प्रल्हाद पाटील, राजीव मांढरे, अशोक हकीम, जहागीर खान, शामकांत कुळकर्णी, गणेश कोळी, दिपक झुंझारराव, धनराज शिंदे, अरुण भोई, श्रृती मराठे आदी उपस्थित होते.
खोटे नगर येथे रक्तदान शिबिर
खोटे नगर येथे साई मोरया गृपतर्फे गोळवलकर रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबरीच्या यशस्वीतेसाठी उमाकांत जाधव, प्रपंच पाटील, हितेश पाटील,चेतन काजळे, संजय खरात,विलास कुमावत, निखील जाधव, धिरज पवार, कल्पेश सपकाळे व सिध्दांत यांनी कामकाज पाहिले.
प्रतिमेची मिरवणूक
शिवाजी महाराजांचया जयंतीनिमित्त विद्यापीठात सकाळी विद्यार्थ्यांनी शिवजी महाराजांच्या प्रतिमेची जल्लोषात मिरवणूक काढली. वसतिगृहापासून प्रशासकीय इमारतीपर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. उत्साहाने विद्यार्थी यात सहभागी झाले होते. मिरवणूकीत घोड्यावर बसलेले मावळे,बग्गीत छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभुषा परिधान केलेले विद्यार्थी सहभागी होते. मिरवणूकीत विद्यार्थिंनींचाही सहभाग लक्षणिय होता. विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
रिपब्लिक पार्टी ऑफ इंडीया आठवले गटातर्फे पक्ष कार्यालयांत शिवजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराजांच्या प्रतिमेला महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी माल्यार्पण केले. याप्रसंगी जळगाव विभागाचे अध्यक्ष दिपक सपकाळे, जिल्हा सचिव भरत मोरे, यशवंत घोडेस्वार, जिल्हा उपाध्यक्ष नितीन अस्मार, तालुका अध्यक्ष रमाताई ढिवरे, महानगर युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे, कार्याध्यक्ष सागर सपकाळे, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, कामागार महानगराध्यक्ष भिमराव सोनवणे, अशोक पारधे, किरण अडकमोल, मुकेश टिल्लोरे, सागर गायकवाड, प्रदिप पाटील, शशिकांत देशमुख, राजु म्हस्के, सुमनबाई इंगळे, ईश्वर चंद्रे, पुनम जोहरे, शकील पिंजारी, अश अशफाक खाटीक आदी उपस्थित होते
किल्ला बनवण्याची स्पर्धा
शिवजयंतीनिमित्त जे. के. इंग्लिश स्कूलमध्ये किल्ला बनवण्याची स्पर्धा झाली. या वेळी नीता सोनवणे, दीपाली फुसे, निकीता बारी, पूनम ठाकूर, ज्योती श्रीवास्तव यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी गट बनवून किल्ले बनवले. यात अंजली चव्हाण, हरीश गोयल, संस्कृती श्रीवास्तव, प्रणव वाणी, मयूर तावडे, दुर्गेश कोळी, गौरव सोनवणे, खुशी मौर्य, चैतन्य जाधव, गजानन सोनवणे, नीलेश गवळी, क्रिश पाटील, मीनाक्षी शंखपाळ, सुशील तायडे, प्रेम कोळी, साहिल पाटील, आस्मा चौधरी, ब्रिजेश कोळी, सुधम्म अडकमोल, आरुशी मौर्य, श्रेयश इंगळे, इशांत सोनवणे, गौरव बारसे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
शिवतीर्थ भगवा मय
लाडक्या छत्रपती च्या दर्शना साठी हजारो नागरिकांनी शिवतीर्थावर उपस्थति लावली होतो संपूर्ण परिसर भगवामय झाले होते. महाराजांच्या दर्शनासाठी दिवसभर शिवतीर्था वर रींग लागली होती ढोल-ताशा वाजवीत छत्रपती शिवाजी महाराजांना विविध प्रात्यक्षिके सादर करून अभिवादन करण्यात येत होते. शिवकालीन युगात चालणार्या विविध युद्धाच्या कसरती दाखविण्यात आल्या. भगवामय झालेल्या शिवतिर्थाला जणू शिवकालीन युगात तर नाही असा भास उपस्थितांना होत होता महिलांना पारंपरिक वेशभूषा करुन मोटारसायकल रॅली काढली.
महावितरण कार्यालय
जळगांव परिमंडळ- महावितरणच्या जळगांव परिमंडळातर्फे आज दि. 19 फेब्रुवारी, 2017 रोजी छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्य अभियंता श्री.ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास अधिक्षक अभियंतासंजय आकोडे, कार्यकारी अभियंता धनंजय मोहोड, प्रणाली विश्लेषक विलास फुलझेले, उपकार्यकारी अभियंता सर्वश्री. नितीन पाटील, अजय धामोरे ,सहाय्यक अभियंता गिरिष चौधरी, जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे, प्रमुख लिपिक मधुसुदन सामुद्रे, अनिल पाटील, राजेश अहेर आदी अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपक कोळी, चरणदास देशमुख, जितेंद्र पाटील आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी कामकाज पाहिले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली.
स्वराज निर्माण सेनेतर्फे कार्यक्रम
स्वराज निर्माण सेने तर्फे शिवतीर्थावर शिवरायांना अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. या वेळी महाराजांची राजेशाही थाटात महाआरती करण्यात आली होती. भगवे फेटे व झेंडे, ढोल ताशाच्या गजरात असंख्य कार्यकर्त्याच्या उपस्थित शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. टॉवर चौकातून ते थेट शिवतीर्था पर्यत वाजत गाजत मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
मोफत आरोग्य शिबीर
शांतिनिकेतन हौसींग सोसायटी मध्ये शिव जयंती निम्मिताने मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले होते.रविवारी रोजी सकाळी 10 ते 15 वर्षे वयोगटातील मोफत शिबिरे घेण्यात आले. शिबीर मध्ये हॅप्पी किड्स हाँस्पिटल दर प्रीती जोशी , दर निखिल राणे उपस्थित होते. बागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. शबीरचे आयजन मोरया मित्रमंडळा च्या वतीने करण्यात आले होते.