देखाव्यांना जिवंत करणारा कलाकार ‘आकाश

0
चिंचवड: पिंपरी-चिंचवडचा आकाश थिटे हा कलाकार मागील बारा वर्षांपासून नाटकात लेखन, दिग्दर्शन, अभिनय करतो आहे. 6 वर्षांपासून तो गणपती उत्सवात सादर होणार्‍या जिवंत देखाव्याच्या संहितांचे लेखन करीत आहे. तर त्याचा आवाज पिंपरी-चिंचवड व पुण्यामधील अनेक मंडळांमध्ये ऐकायला मिळतो आहे. नाटकात काम करत असल्याने परिसरातील अनेक कलाकारांची त्याला डबिंगसाठी साथ मिळते.
कलात्मक व सर्वसामावेशी संहिता लेखन आणि आधुनिक पद्धतीचे उत्तम दर्जाचे पार्श्‍वसंगीत यामुळे व मंडळांच्या उत्तुंग कामगिरीमुळे त्याने लिहिलेल्या व रेकॉर्ड केलेल्या अनेक देखाव्यांना आत्तापर्यंत बक्षिसे मिळाली आहेत. गॅलॅक्सी मीडिया लॅब्सच्या माध्यमातून स्क्रिप्ट, रेकॉर्डिंग, पार्श्‍वसंगीत, व्हिडीओ, सिनेमॅटिक शूट या सर्व गोष्टी एकत्रच वाजवी दरात मिळत असल्याने अनेक मंडळे गेल्या 6 वर्षांपासून गणेशोत्सासाठी आकाशची आठवण काढतात. मग गणपतीच्या आधी महिनाभर सुरु झालेला प्रवास अगदी गणपती विसर्जनापर्यंत अधिकाधिक रोचक होत जातो.
सामाजिक विषय मांडता येतात
या अनुभवाबद्दल बोलताना आकाश म्हणाला की, मुळात पैसे कमवायचे या उद्देशाने याकडे पहात नाही. त्यासाठी मी शॉर्टफिल्म्स आणि अ‍ॅड शूट, प्री वेडिंग या गोष्टी करतोय. जेव्हा गणपती येतात तेव्हा त्या 10 दिवसांमध्ये हजारो लोकांसमोर विविध सामाजिक विषय मांडता येतात. ‘झाडे लावा’ हा विषय आजही तेवढाच महत्वाचा आहे. तर अवयवदान ही काळाची गरज आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांना हसवत हसवत सामाजिक विषय मांडणे यात त्याचा हातखंडा आहे. रोहित सावंत, सागर माने, निलेश टेपाळे, श्रद्धा पाटील आणि आकाश हे सारे रात्रंदिवस काम करतात. मंडळाच्या देखाव्यांमध्ये पाहतो-ऐकतो तो आवाज तयार होण्यासाठी हे कलाकार अविरत मेहनत घेत असतात. आकाशने मागील वर्षी केलेले ‘बाप्पा बोलतोय’ हे स्क्रिप्ट लिहिलं आणि त्याच्याच आवाजात रेकॉर्ड केले होते. याला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली होती.