धुळे। येथील डांगुर्णे येथील रहिवासी असलेल्या शोभाबाई सुनील कोळी (26) या विवाहितेचा सन 2015 ते जून 2016 या कालावधीत सासरी देगाव तालुका शिंदखेडा येथे सासरकडील मंडळींनी विहीर खोदण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणले नाहीत या कारणावरून तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला.
तसेच तिचे लग्न ठरवतांना पती नोकरीस आहे, असे खोटे सांगून तिची सासरच्यांनी फसवणूक केली. याप्रकरणी शोभाबाई कोळी यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुनील वेडू कुवर, वेडू धोंडू कुवर, कमलाबाई वेडू कुवर, मनीषाबाई दयानंद शिरसाठ, दयानंद देविदास शिरसाठ, प्रमिला सुभाष कोळी, सुभाष धर्मा कोळी, राजेंद्र भाईदास कोळी, नागराज भाईदास कोळी, लताबाई राजेंद्र कोळी, रावसाहेब महादू बोरसे, अभिमन देवकषा कुवर सर्व रा. नंदाणे, ता. शहादा, जि. नंदुरबार या 12 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.