मुंबई – जम्मू काश्मीर येथील बसवरील आतंकवादी हल्ल्याची संपूर्ण देशातून निंदा होत असताना एक नावाचे मात्र संपूर्ण देशातून चांगलेच कौतुक होत आहे. ते नाव म्हणजे सलीम शेख. हे सलीम शेख म्हणजे ज्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या बसचे चालक आहेत. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बस मधील ५० जणांचा जीव वाचवला. त्या सलीम शेख यांचे आज मुंबईत आगमन झाले. रजा अकादमी मार्फत सलीम शेख यांचे कौतुक आणि सत्कार करण्यात आला.
जम्मू काश्मीर येथील अनंतनाग जिल्ह्यात काही दहशतवाद्यांनी ११ जुलै रोजी रात्री एका बसवर हल्ला केला ज्यात ६ महिलांसमवेत गुजरात मधील ७ अमरनाथ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३२ जण जखमी झाले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. यावेळी बुसमशील इतर ५० जणांचे प्राण वाचवणारे बस चे चालक सलीम शेख यांनी पावाची बाजी लावून बसचा वेग वाढवून गाडी थेट सेनेच्या कॅम्प मधेच थांबवली. यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यात मदत झाली. अश्या या देवदूताच्या सत्कारासाठी खुद्द भाजपचे, मुंबई आशिष शेलार मुंबई, मज्जित बंदर येथील सामाजिक आणि धार्मिक संथ रजा अकादमीत उपस्थिती दर्शविली. त्याचबरोबर यावेळी रजा अकादमीचे जनरल सेक्रेटरी मुहम्मद सईद नुरी, रजा अकादमीचे सेक्रेटरी शकील रजाब, मौलाना रेहमान सिंग, मौलाना हाफिज जुनैद हे उपस्थित होते. यासर्वांनी सलीम शैख यांचा सत्कार करून उत्तम कामगिरी बाबत त्यांचे खूप ख्यप कौतुक केले.
आशिष शेलार यांचे मनोगत
आशिष शेलार यांनी सलीम शेख यांचे कौतुक करताना म्हटले कि, मी एका अशा व्यक्ती सोबत बसलो आहे कि ज्या व्यक्तीने आपल्या जीवाची बाजी लावून लोकांचा जीव वाचवला. विशेष म्हणजे हिंदू मुसलमान असा कोणताही भेदभाव न करता यांनी फक्त बंधू आणि भगिनी हि दोनच नाती समोर ठेऊन ५० पर्यटकांचा जीव वाचवला. अश्या व्यक्तीला आज मला भेटण्याची संधी मिळाली हे मी माझे खूप मोठे भाग्य मानतो.
सलीम शेखचे मनोगत
मी आज जे काही केले आहे ते मी कधी करेन असं मला कधीही वाटलं नव्हतं. आता जरी संपूर्ण देश माझे कौतुक करत असेल तरी माज्या होऊन जे लोकांना वाचवण्याचे काम झाले आहे ते आल्लानेच माझ्याकडून करून घेतले आहे. अल्लामुळेच मी हे करू शकलो आहे आणि यापुढेही करत राहीन.