धुळे । देवपुरात दोन तरुणांवर चाकु हल्ला करण्रात आला आहे. कृषी कॉलनी देवपुर,येथील प्रविण पंडीत मेढे (वय २५) याने दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री १२.३० वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल रसराजच्या पुढे प्रविण आणि त्याचा मित्र पायी घरी जात असतांना काही एक कारण नसतांना अभय,प्रशांत,सानप या तिघांनी प्रविणवर चाकूहल्ला केला. यात त्याच्या छातीला, कंबरेला गंभीर जखमा झाल्या आहेत. तसेच त्याच्यावर लाकडी दांडक्याने देखील प्रहार करण्यात आला. तसेच नगांवबारी चौफुली मारुती मंदिराजवळ राहणार्या नरेश कांतीलाल गवळी (वय २३) या तरुणाने देवपुर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास नरेश हा मोटरसायकलने देवपुरातील त्रिदेव हॉटेलजवळून जात असातंना सुनिल गोपाल, मगन गोपाल सुभाषगोपाल, साईनाथ गोपाल, शुभम देशमुख,अविनाश परदेशी, गौरव नरोटे यांनी त्याची दुचाकी अडवून त्याच्यावर लोखंडी रॉड, हॉकीस्टिक, घाव, लोखंडी फावडीने वार करुन त्याला गंभीर जखमी केले आणि ठार मारण्याचा प्रयत्न केला.