नवापुर। शहरातील देवळफळी भागात पंप हाऊस परिसर असलेल्या रहिवाशांना भेडसावणार्या समस्याबद्दलचे निवेदन सन्मान मोहला मल्टीपर्पज आणि रुलर डेवलपमेन्ट सोसायटीचाअध्यक्षा दिपांजली गावीत यांनी न.पा मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे यांना दिले आहे. त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे, की देवफळी पंप हाऊस परिसर येथील रहिवासींना पिण्याच्या पाण्याची टंचाई, कचरा, गटारीतील घाण तसेच पाईप लाईन, संडासाच्या टाक्याची पाईप लाईन अश्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व समस्यांमुळे नगारिकांना आजारपणाला सामोरे जावे लागत आहे.
गटारींचे काम अपूर्ण
शहरात पुलाचे व गटारीचे काम अपुर्ण असल्यामुळे गटारीत लहान मुलगा 9 ऑगस्ट रोजी पडण्याची घटना घडली आहे. जर जिवाची काही हानी झाली तर याला जबाबदार नगरपालीका असणार की मग इंजिनियर की ठेकेदार..? ताबडतोब कार्यवाही करुन आमच्या समस्यां सोडवण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. तसेच आरोग्य विभागतर्फे देवळफळी भागात कुठल्याही प्रकारचे सहकार्य होत नसल्याची तक्रार देखील त्यांनी केली आहे. गटारींमध्ये कसाई खान्यातुन सोडलेल्या पाईप लाईन मधुन रक्ताची धार सोडली जाते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. गाड्या पुलाचे काम अपुर्ण असुन त्यावर पार्कीग केली जात आहे. घंटागाडी कचरा घेण्यासाठी येत नाही. या समस्यांचे निवारण झाले नाही तर नगरपालीकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनावर दिपांजली गावीत यांची सही आहे.