देवमोगरा माता मंदिराचे लवकरच निर्माण!

0

शिरपूर । सर्वांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. इंग्रजी शाळा उभारुन गुणवत्तापूर्ण काम सुरु आहे. शिरपूर पॅटर्न मधून पाण्याचे काम सातत्याने सुरुच आहे. गावात देवमोगरा मातेच्या मंदिराचे निर्माण लवकरच करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी लाकड्या हनुमान येथे आरोजित मोफत मोतिबिंदू, नेत्र तपासणी, नेत्र शस्त्रक्रिया आरोग्य शिबीराचे उद्घाटन प्रसंगी केले.

55 जणांवर शस्त्रक्रिया
आर.सी. पटेल मेडीकल फाऊंडेशन व शंकरा आय हॉस्पीटल यांच्या सहकार्याने लाकड्या हनुमान येथे संपन्न झालेल्या शिबीरात 247 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात 55 जणांवर नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. कार्यक्रमास आ. काशिराम पावरा, शंकरा आय हॉस्पीटलचे डॉ. अजय ठाकूर, डॉ. राजन मुक्तान, डॉ. वंशू थरेज, शिरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन, माजी सरपंच व बाजार समिती माजी संचालक सुक्राम पाडवी, सरपंच शिवाजी पावरा, रविंद्र महिरराव, अनिल महिरराव, संदीप पाडवी, विक्रम पाडवी, धनसिंग पाडवी, धरमसिंग पाडवी, माजी पंचायत समिती सदस्य मीरूबाई पावरा, सुभाष पाडवी, पिंटू पाडवी, बापू गोपाळ, ग्रामसेवक नीलेश पाटील, बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील, गोकुलसिंग राजपूत, सूतगिरणीचे संचालक निलेश महाजन, साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, पिपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, सूतगिरणी संचालक निलेश महाजन, उमर्दाचे जगन शेवाळे, सुळे सरपंच शिकराम पावरा, उपसरपंच भुरा राजपूत उपस्थित होते.