देवरे विद्यालयात पर्यावरण पुरक कार्यशाळा

0

धुळे । तालुक्यातील कै.भा.सु.देवरे माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय रावेर येथे इको फ्रेंडली व पर्यावरण पुरक कार्यशाळे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी मातीची प्रात्यक्षीके करून दाखविण्यात आलीत. गणेशमूर्ती , बैल आणि इतर विविध मुतीॅ यावेळी बनविण्यात आलेत व मार्गदर्शनही करण्यात आले.

सध्या गणेशोत्सव कालावधी असल्याने या कार्यशाळेत सर्व विद्यार्थ्यांनी या इको फ्रेंडली व पर्यावरण पुरक बनविलेले गणेश मुर्तींची स्थापना करावी असे यावेळी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. तसेच केमिकल युक्त मुतीॅचे पर्यावरणावर होणार्‍या परिणामची माहिती देण्यात आली. कार्यशाळा यशस्वीकरण्यासाठी मुख्याध्यापक सी.एन.शेवाळे ,एस.वाय.पाटील ,बी.आर.देवरे , व्ही. आर. पाटील, वाय. एस.पाटील ,प्रशांत देवरे ,बारकु खैरनार आदींनी कामकाज पाहिले.