नवापूर: शहरातील देवळफळी ते करंजी बुद्रुक एमआयडीसी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष आर.सी.गावित यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
करंजी बुद्रुक रस्ता गेल्या दोन ते तीन वर्षापासून अत्यंत खराब झालेला आहे. ध्या कोविड १९ संसर्गजन्य आजारामुळे प्रशासनाचे काम बंद होते. परंतु आता नंदुरबार जिल्ह्यात काही अटी-शर्ती शिथिल करण्यात येवुन बांधकामास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे खड्डे तरी बुजविण्यात यावे व वाहतुकीला अडथळा होणार नाही म्हणून नवापूर शहरातील देवळफळी ते करंजी बुद्रुक रस्ता ताबडतोब दुरुस्त करण्यात यावा, यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर आर.सी. गावित, सोनखडक्याचे कांतीलाल गावित,कुंकराणचे दिलीप गावित,विरसिंग गावित यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.