नवापूर । देवळफळी (भीमनगर) भागात गटारीची सोय करावी अशी मागणी गरीब वस्ती असलेल्या देवळफळीतील युवकांनी दिले केली आबे नवापूरचे मुख्याधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, नवापुर शहरात स्वछता मोहीम ही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे, त्या अनुषगांने आमच्या देवळफळी भागात काही दिवसापासून घरगुती बाथरूम चे सांडपाणी रस्त्यावरुन ते वाहते व मोठ्य मोठ्या खड्यात ते अनेक मोठ्या प्रमाणावर तेथेच ते घाण पाणी साचुन राहते त्यामुळे परिसरात साथीचे आजार तायफेड, मलेरिया, सर्दी, खोकला इत्यादी आजार उद्भवत आहेत. या सांडपाण्यामुळे सर्वत्रकडे दुर्गंधी पसरते व रस्त्यावरून येणार्या जाण्यार्या वाहनधारकांना व पायी जाणार्याना त्याचा त्रास होतो तोंड व नाक दाबुन जावे लागते या भागातील रहिवाशांना वसाहतीत राहणे खुप त्रासदायक ठरत आहे तरी देवरफळी (भिमनगर) भागात मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी व या भागात गटारीची सोय लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी निवेदन तथा मागणी करत आहेत. निवेदन देती वेळी आकाश दिलीप बेडसे सुनील थोरात, शिवसेनेचे किशन शिरसाठ, रोहन पवार, देवळफळीतील युवक सागर बेडसे, गोतम बैसाने, कैलास शिरसाठ, अतुल पगारे, जयेश वेंदे, विशाल जाधव, कुणाल पगारे, शंकर बिराडे आदि उपस्थित होते.