चाळीसगाव । तालुक्यातील देवळी येथील विठाबाई लहु निकम (45) मंगळवारी 8 ऑगस्ट रोजी सकाळी शेतमजुरीसाठी कुटुंबासह जात असतांना देवळी गावात नदीजवळ आरोपी प्रकाश वामन निकम, सोमनाथ प्रकाश निकम, किसन प्रकाश निकम, जिजाबाई प्रकाश निकम, सुरेश वामन निकम, योगेश सुरेश निकम, रावसाहेब सुरेश निकम, मिनाबाई सुरेश निकम सर्व रा देवळी ता चाळीसगाव त्याठिकाणी आले व काही कारण नसतांना आरोपी सोमनाथ प्रकाश निकम, प्रकाश वामन निकम यांनी लोखंडी पास त्यांचा भाऊ जंगलु लहु निकम यांच्या डोक्यावर मारुन जखमी केले.