नवापूर: तालुक्यातील देवळीपाडा गावातील नागरिकांवर ग्रामसेवकाने पाणीपुरवठा नळ कनेक्शन धारकांना अनामत रक्कमच्या नावे 1500 रुपये वसुलीचे आदेश दिले आहेत. अनामत रक्कम 7 दिवसात जमा न केल्यास नळ कनेक्शन तोडण्याचे आदेश ग्रामसेवकाने गावकऱ्यांवर लादला आहे. आज देशाची व राज्याची स्थिती covid-19 च्या संसर्गमुळे दोन महिन्यापासून जनतेला काम नाही. देवळीपाडा ग्रामसेवकाच्या आदेशामुळे गावातील जनतेला आता पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागेल, अशा आदेशाला त्वरित रद्द करून ग्रामसेवकावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास नंदकुमार वाळेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
लेखी निवेदन देत्यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, जिल्हा चिटणीस एजाज शेख, माजी तालुका उपाध्यक्ष अर्जुन गावित,जयंती अग्रवाल उपस्थित होते.