देवांशने सिद्धांतला झुंजवले

0

नांदेड । औरंगाबादच्या देवांश पटेलने 12 वर्षांखालील मुलांच्या कॅडेट गटातील लढतीत ठाण्याच्या सिद्धांत देशपांडेला चांगलेच झुंजवले. यशवंत महाविद्यालयाच्या सभागृहात खेळवल्या जात असलेल्या या स्पर्धेतील ही लढत चौथ्या गेमपर्यंत रंगली. सिद्धांतने आगेकूच करताना हा सामना 13-11, 9-11, 11-4, 11-8 असा जिंकला. या गटातील अन्य लढतीत मुंबई उपनगरचा आणि चौथे मानांकन मिळालेल्या कुशल पटेललाही अकोल्याच्या दर्श जालनच्या कडव्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले. अनुभवी कुशलने तिसर्‍या फेरीत स्थान मिळवताना दर्शवर 10-12, 11-6, 11-4, 11-4 अशी सरशी मिळवली. यवतमाळच्या आयुष पांडेनेही पुण्याच्या अद्वैत धवळेला चांगले झुंजवले. अद्वैतने हा सामना 9-11, 6-11, 11=7, 11-5, 11-8 असा जिंकला.

अन्य निकाल : सब ज्युनिअर मुले : दिपीत पाटील (ठाणे) विजयी विरुद्ध राज कोठारी (अकोला) 11-6, 11-1, 11-3, अभिषेक तोष्णीवाल (सोलापुर) विजयी विरुद्ध सनत जैन (पुणे) 11-13, 11-5, 6-11, 11-7, 11-5.