देवाची भक्ति विकाऊ नाही तर टिकाऊ

0

पिंपरी-चिंचवड : देवाची भक्ती ही टिकाऊ असते विकावू नाही, असे मत पंडित देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी व्यक्त केले. विश्‍व शांति सेवा समिति पुणे व विश्‍व शांति सेवा चॅरिटेबल ट्रस्ट दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथे केलेल्या श्रीमद भागवत कथेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भागवत कथेचे दीप प्रज्वलन उप महापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेविका शर्मिला बाबर, नगरसेवक अमित गावडे, देहूरोड कँन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सुभाष देवी चंद बंसल, अग्रसेन ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष बंसल,विश्‍व शांती सेवा समितीच्या पुणे विभागाचे अध्यक्ष जे. पी जगदीशप्रसाद सिंघल, उद्योजक प्रेम चंद मित्तल, विनोद बंसल, जोगिंदर मित्तल, सागर अग्रवाल, के. एल. बंसल आदी उपस्थित होते.

भक्ती भाव महत्वाचे
ठाकुर महाराज म्हणाले की, श्रीमद भगवतेत चार अक्षर आहे. भा ग व त, भ-भक्ति, ग-ज्ञान, व-वैराग्य, त-तरुण उद्धार यथार्त तत्पश्‍चात मोक्ष, भागवत हे वेद रूपी वृक्षाचे फल आहे. देवाला जाणून घेण्याची इच्छा म्हणजेच भागवत आहे. त्यामुळे भगवानाला जाणून घ्या. जगातील सर्व नातेसंबंध तूटतील पण देव तुमची साथ सोडणार नाही. देव आणि भक्त यांच्यात नातेसंबंध बनवा. ते संबंध घट्ट करा. ‘जैसे मीरा ने सोचा, गोपियों ने सोचा और शबरी ने सोचा।’ भक्तिमध्ये धन नव्हे तर भाव महत्वाचे आहे. मात्र भक्तीत पावित्र्य असले पाहिजेत. कथा श्रवण करता करता भक्तांनी नृत्याचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सुसंचालन विजय शर्मा यांनी केले.