देवाचे आभार मानून अनुष्काने विराटला केलं बर्थडे विश

0

मुंबई : विराट कोहली आज 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. कोणताही दौऱ्यावर नसल्यामुळे विराट यावेळी पत्नी अनुष्कासोबत वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाली आहे. अनुष्काने विराटला शुभेच्छा दिल्या आणि देवाचे आभार मानले. तिने विराटसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला आणि लिहिले,”विराटला या जगात आणल्याबद्दल देवा तुझे आभार.”

लग्नानंतरचा विराटचा पहिलाच वाढदिवस साजरा करण्यासाठी विरुष्का हरिद्वारमध्ये गेले आहे. कोहली आणि अनुष्का शनिवारी रात्री देहरादून येथील जॉली ग्रांट विमानतळावर उतरले आणि तेथून ते नरेंद्र नगर येथील हॉटेल आनंद येथे उतरले. ७ नोव्हेंबरपर्यंत विरुष्का हरिद्वार येथे मुक्कामी आहे. त्यांनी येथील अनंत धाम आत्मबोध आश्रमालाही भेट घेतल्याचे बोलले जात आहे.