जळगाव । देवदास कॉलनीतील प्रौढ राहत्या घरात मृत अवस्थेत मिळून आल्याची घटना मंगळवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी सौरभ काशिव यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांची घटनास्थळी जावून पाहणी देखील करण्यात आली.
शेजारच्यांनी कुटूंबियांना कळविली घटना
दिपक श्रीहरीसा भारोटे (वय-49) हे देविदास कॉलनीतील रहिवासी असून ते घरात एकटेच राहत होते तर त्यांना दारूचे व्यासन जडले होते. तर पत्नी योगिता भारोटे या वेगळ्या राहत होत्या. दरम्यान, मंगळवारी सकाळी भारोट यांच्या घरातून उग्र वास येत असल्याने शेजारी राहणारे संचेती कुटूंबियांनी दार ठोठावून दिपक भारोटे यांना आवाज दिला. परंतू आतून प्रतिउत्तर येत नसून कोणीही दार उघडत नसल्याने संचेती यांनी लागलीच योगिता भारोटे यांना संपर्क साधला व हकीकत सांगितली. यानंतर योगिता भारोटे यांनी भाऊ सौरभ यांना कळवून दोघांना देविदास कॉलनी गाठत घराचा दार उघडून आत पाहिले असता दिपक भारोटे हे मृत अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांनी घटनास्थळी जावून संपूर्ण परिसराची पाहणी केली. तर याप्रकरणी आयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.