लातूर: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. मंत्री, आमदार, खासदारासह अनेक लोकप्रतिनिधी आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू निकटवर्तीय मानले जाणारे तसेच स्वीय सहायक राहिलेले लातूर जिल्ह्यातील औसाचे भाजपा आमदार अभिमन्यु पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आमदार पवार यांनी ट्विटरवरून दिली. त्यांच्यासोबतच त्यांच्या मुलालादेखील कोरोनाची लागण झाली.
आशिर्वाद असू द्या पाठीशी
मला हलकासा ताप/खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केलेली.मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पाॅजीटीव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत@BJP4Maharashtra
१/३— Abhimanyu Pawar (@AbhiPawarBJP) July 8, 2020
‘मला हलकासा ताप/खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केलेली. मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत’ असे पवार यांनी सांगितले आहे.
लातूर मधील आरोग्य व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच लातूर येथेच पुढील उपचार घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. आम्हा दोघांचीही तब्येत उत्तम असून काळजीचे काहीही कारण नाही. एक नम्र विनंती आहे, मागच्या ४-५ दिवसांत माझ्या वा परिक्षीतच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला
२/३— Abhimanyu Pawar (@AbhiPawarBJP) July 8, 2020
‘लातूरमधील आरोग्य व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच लातूर येथेच पुढील उपचार घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. आम्हा दोघांचीही तब्येत उत्तम असून काळजीचे काहीही कारण नाही,’ अशी माहिती त्यांनी दिली आहे. मागच्या ४-५ दिवसांत माझ्या वा परिक्षीतच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घ्यावे तसेच खबरदारी म्हणून कोरोना चाचणीही करून घ्यावी, असे आवाहन पवार यांनी केले आहे.
होम क्वारंटाईन करून घ्यावे तसेच खबरदारी म्हणून कोरोना चाचणीही करून घ्यावी.
काही महत्त्वाचे काम असल्यास मी मेसेजच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आपण सर्वांनीच स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्यावी. तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने लवकरच बरा होऊन जनसेवेत रूजू होईल असा विश्वास आहे.
३/३— Abhimanyu Pawar (@AbhiPawarBJP) July 8, 2020
दोन दिवसांत भाजपाच्या चार आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. काल दिवसभरात तीन भाजपाच्या आमदारांना कोरोनाची बाधा झाली. यातील दोन आमदार पुण्यातील आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना झाला होता. पुण्याच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोना झाला आहे. दौडचे आमदार राहुल कुल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.