देवेंद्र फडणवीस जास्त दिवस विरोधी पक्ष नेता राहणार नाही: भैय्याजी जोशी

0

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फार काळ विरोधी पक्षाचे नेते राहणार नसल्याचे संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळेराजकीय क्षेत्रात उलट सुलट चर्चांना उत आला आहे. देवेंद्र यांच्या भाग्यात विरोधी पक्षनेता हा जास्त दिवसांचा विषय नाही. तसंच माजी मुख्यमंत्रीपदही अल्पायू आहे. ही दोन्ही पदं अल्पायू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मंत्रीपद मिळणार की, राज्यातील सत्ताकेंद्रात पुनरागमन करणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

नागपुरात साधना बँकेचा लोकार्पण सोहळ्यात भय्याजी जोशी यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात भैय्याजी जोशी यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा देवेंद्र फडणवीस हेदेखील मंचावर उपस्थित होते. नुकतीच काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या भेटीगाठी घेतल्या तर दुसरीकडे संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकांनंतर जनमताचा कौल हा महायुतीलाच मिळाला होता. मात्र शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून काडीमोड झाला. त्यानंतर भाजपाने अजित पवारांची साथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथही घेतली. मात्र हे सरकार अवघं 72 तास चाललं. त्यानंतर अजित पवारांनी फडणवीस यांची साथ सोडल्याने फडणवीस यांनाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला.