नागपूर: आज राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अशी परिस्थिती जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून आली आहे. भाजपने जिल्हा परिषद निवडणूक अधिक प्रतिष्ठेची केली होती. दरम्यान नागपूर जिल्हा परिषदेत भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादीने आघाडी घेतली असून भाजप पिछाडीवर आहे. सुरुवातीच्या काळानुसार भाजपचा पराभव दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.