जळगाव । जिल्ह्यात 15 ऑगस्ट ‘स्वातंत्र्य दिनी’ स्वतंत्र्य भारताचा 71 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय, सामाजिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय, खासगी संस्था, राजकीय क्षेत्रातून ध्वजारोहण झाल्यानंतर सांस्कृतीक कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परीषदेच्या शाळेच्या वतीने गावातून घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली होती. मान्यवरांकडून देशाला समर्पीत झालेले नेते आणि शहीदांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. संपुर्ण जिल्ह्यात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
चाळीसगाव प्रांत शरद पवार यांच्याहस्ते धज्वारोहण
चाळीसगाव । भारतीय स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापन दिनात्सावानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस परेड मैदानावर उप विभागीय अधिकारी शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार उन्मेश पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगरध्यक्षा आशाताई चव्हाण, पं.स. सभापती स्मितल बोरसे, जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, तहसीलदार कैलास देवरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पोलीस अप्पर अधिक्षक प्रशांत वच्छाव, पोलीस उपअधिक्षक अरविंद पाटील, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पाचोरा येथील पोलिस कवायत मैदानावर ध्वजारोहण
पाचोरा । पाचोरा येथील पोलिस कवायत मैदानावर उपविभागीय जितेंद्र पाटील यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार किशोर पाटील, पं.स. सभापती सभापती सुभाष पाटील, नगराध्यक्ष संजय गोहील, पोलिस उपअधिक्षक केशव पातोंड, तहसिलदार बी.ए. कापसे , गटविकास अधिकारी गणेश चौधरी, पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, पोनि शामकांत सोमवंशी, उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांना पोनि सचिन सानप, सपोनि सिध्दार्थ खरे, पंकज शिंदे, दत्तात्रय नलावडे सह कर्मचारी व गृहरक्षक दलाकडून मानवंदना देण्यात आली. पाचोरा पोलिस कवायत मैदानावर झालेल्या ध्वजारोहणास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, निवासी नायब तहसिलदार अमित भोईटे, नायब तहसिलदार उमाकांत कडनोर, सीडीपीओ यु.एन. महाले, पं.स.च्या उपसभापती अनिता पवार, पं.स.सदस्या अनिता चौधरी, सदस्य वसंत गायकवाड, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.आर. पाटील, डॉ. अशोक महाजन, डॉ. अनिल देशमुख, पी.टी.सी.चे व्हा. चेअरमन व्ही.टी.जोशी, बीडीओ जितेंद्र महाजन, समाधान पाटील, सरोज गायकवाड, वनपाल बी.पी. पाटील, सहाय्यक निबंधक पी.यु. पाटोळे, नगरसेवक आनंद पगारे, अशोक मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता एस. व्ही. बोंद्रे, डी. एम. पाटील, मंडळ अधिकारी पी.पी. राजपुत, व्ही.एन. पाटील, वनश्री डिगंबर पाटील सह पोलिस, होमगार्ड कर्मचारी श्री. गो.से. हायस्कुलचे विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते.
पाचोरा येथील श्री. गो.से. हायस्कुलमधे संस्थेचे शालेय समिती चेअरमन खलिल देशमुख यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्याध्यापक एस.डी. पाटील, उपमुख्याध्यापक एल.एस. शिंपी, प्रमोद पाटील सह शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पाचोरा येथील निर्मल सीड्स मध्ये कार्यकारी संचालक आर. ओ. पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी संचालक डॉ. जे.सी. राजपुत, डॉ. सुरेश पाटील, व्यवस्थापक एस.एस. पाटील, प्रमोद दळवी, श्री.हलकुडे, रवि चौरपगार उपस्थित होते. एम.एम. महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पी.टी.सी. चेअरमन संजय वाघ, व्हा. चेअरमन व्ही.टी. जोशी, प्राचार्य डॉ. बी.एन.पाटील, उप प्रा.एस.एम. पाटील, प्रा. डॉ. वासुदेव वले, सह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पाचोरा पंचायत समिती मधे सभापती सुभाष पाटील यांनी ध्वजारोहण केले. प्रसंगी उपसभापती अनिता पवार, सदस्या अनिता चौधरी, वसंत गायकवाड, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, हजर होते. पाचोरा नगरपरिषदेत नगराध्यक्ष संजय गोहील यांनी ध्वजारोहण केले. उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्याधिकारी किरण देशमुख, प्रशासन अधिकारी प्रकाश भोसले, ललित सोनार सह मोठ्या प्रमाणात नगरसेवक व कर्मचारी हजर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन मंडळाचे उच्च माध्य. व्यवसाय अभ्यासक्रम येथे रोहीत ब्राम्हणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी प्राचार्य आर.व्ही.पाटील, विनोद ब्राम्हणे, जी.आर.तेली, जी.बी.गोसावी, एस.के.पिंजारी, डी.बी.सोनवणे, एम.व्ही. देशमुख, एस.जी.कदम, ए.एस. पाटील, सी.ई. सपकाळे उपस्थित होते.
नंदगाव येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात
जळगाव । तालुक्यातील नंदगाव येथे भारताचा सत्तरावा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण गावच्या सरपंच कविता सोनवणे यांच्या हस्ते झाले तर जि.प. प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण गोशाळेचे योगधामगुरु श्रीमानजी नारायणजी महाराज यांच्या हस्ते झाले.यावेळी योगधामगुरू यांनी देशभक्तीवर भाषण दिले तर शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत तसेच देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे शिक्षक कोळी गुरूजींनी केले. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर सरपंचा कविता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमास व ग्रामसभेस शाळेचे शिक्षक,अंगणवाडी कर्मचारी,ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी, पोलिस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, माजी सरपंच आदींसह गावातील आबालवृध्दांची उपस्थिती लाभली.
‘अंतरंगातील कळ्या’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
चोपडा । किमया प्रकाशन प्रकाशित ‘अंतरंगातील कळ्या’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनी पंकज समूहाचे संचालक पंकज बोरोले यांचे हस्ते करण्यात आले. पंकज बालसंस्कार केंद्राच्या प्रमुख रेखा पाटील लिखित चाळीस कवितांचा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित करण्यात आला. सदर काव्यसंग्रहात शेतकरी, राष्ट्रीय एकात्मता, स्त्री भ्रूणहत्या, शिक्षण इत्यादी विषयावर विशेष भर टाकण्यात आला आहे. सदर पुस्तकासाठी उत्तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्रफुल्ल पाटील वड नगरीकर यांची प्रस्तावना आहे. सदर काव्यप्रकाशन प्रसंगी हेमलता बोरोले, दीपाली बोरोले, भागवत भारंबे, गोकुळ भोळे, श्यामकांत पाटील, एम.व्ही.पाटील, व्ही.आर. पाटील, प्राचार्य डॉ.संभाजी देसाई, नीता पाटील, कवयित्री रेखा पाटील व किमया प्रकाशनचे संपादक आर.डी. पाटील उपस्थित होते.
चोपड्यात स्व.ओंकारदास अग्रवाल स्मृती वास्तूचे उद्घाटन
चोपडा । येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्राच्या इंग्लिश मेडियम स्कुल विभागाच्या स्व. ओंकारदास अग्रवाल स्मृती -वास्तूचे उद्घाटन सोहळा डॉ. विकास हरताळकर यांच्याहस्ते तर नवीन संगणक लॅबचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त सुभाषभाई अग्रवाल यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, उपाध्यक्ष घनःशामभाई अग्रवाल, सचिव अॅड. रविंद्र जैन, कार्यवाहक सुधाकर केंगे, गोवर्धनभाई पोतदार, डॉ. मनोहर अग्रवाल, डॉ. जयंत पाटील सह प्रमुख पाहुणे माजी आ. कैलास पाटील, प्रा. दिलीप सोनवणे, नगराध्यक्षा मनिषाताई चौधरी, उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, व्हा. चेअरमन शशिकांत देवरे, कृउबा सभापती जगन्नाथ पाटील, उपसभापती नंदकिशोर पाटील, चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, कसबे सोसायटी चेअरमन प्रविणभाई गुजराथी, माजी नगराध्यक्ष रमण गुजराथी, जीवन चौधरी, नगरसेवक रविंद्र पाटील, रमेश शिंदे, गजेंद्र जैस्वाल, नारायण बोरोले, कमलाबाई अग्रवाल, सरोज अग्रवाल, करण अग्रवाल, डॉ. विनित हरताळकर, डॉ.अमित हरताळकर, डॉ. नीता हरताळकर, जोत्स्ना हरताळकर, डॉ. निरज पोतदार, डॉ. प्रियंका पोतदार, सुप्रिया सनेर, प्रा. भरत पाटील, सुनिल महाजन, शशिकांत पाटील, शेखर पाटील, निलेश पाटील, सागर पठार, कवी अशोक सोनवणे, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, रंजना दंडगव्हाळ सर्व पत्रकार बंधूसह गावातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आलेल्या पदाधिकार्यांचे आभार मानतांना संगणक लॅबसाठी सहकार्य करणारे सुभाष अग्रवाल व पूणे येथील जूगलकिशोर शाह यांनी 4 संगणक दिल्याबदद्ल त्यांचे आभार मानले तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. संस्थेला यापुढे असेच सहकार्य मिळावे हि अपेक्षा व्यक्त केली. यावेळी घनःशाम अग्रवाल यांचा संपूर्ण परिवारासह, अग्रवाल समाजातील बांधव, सामाजीक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन विद्यालयाचे उपशिक्षक राधेश्याम पाटील यांनी केले.
चोरगाव येथे डीजीटल शाळा, सैनिक निधी बूथचे उद्घाटन
धरणगाव । तालुक्यातील चोरगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने डिजिटल शाळेचे स्वप्न साकार झाले. तसेच ग्रामस्थांच्या पुढाकाराने सैनिक निधी जमा करण्यासाठी सैनिक निधी बूथचे अनावरण स्वतंत्रता दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. प्रसंगी सरपंच रतिलाल सोनवणे, ग्रामसेवक गणेश शिरसाड, प्राथमिक शिक्षक व ग्रामस्त उपस्थित होते. ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रगती पाहता दिवसागणिक ढासळत असल्याचे प्रामुख्याने जाणवते, परंतु प्रत्येक पालकाला आपला पाल्य बाहेर गावी शिक्षणासाठी पाठवणे शक्य होत नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनीच एक विचाराने पुढाकार घेऊन प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी शाळा डिजिटल करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव ग्रामपंचायतकडे मांडला. प्रस्तावावर सरपंचानी तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शाळा डिजिटल करण्याच स्वप्न पूर्ण केले. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी मिळून संपूर्ण मदत या कामासाठी केली. त्यामुळे ग्रामस्थांना डिजिटल शाळा करण्यासाठी रक्कम उभारण्याची गरज भासली नाही. मात्र त्याचबरोबर सैनिक निधी जमा करण्यासाठी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांचा सैनिक निधी जमा करण्याचा मानस आहे. देश संरक्षणासाठी जे दिवसरात्र गस्त घालून आपल्या जीवाची तमा न बाळगता आपले रक्षण करत आहेत. त्यांच्यासाठी एक देशाचा सामान्य नागरिक म्हणून आपणही मदतीचा हात द्यावा अशी धारणा ग्रामास्थानाची आहे. तसेच गावातील शाळा विकसित करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील असा विश्वास सरपंच रतिलाल सोनवणे यांनी पालकांना दिला.
कस्तुरबा विद्यालयात ‘शहीद जवान’ नाटीकेचे सादरीकरण
चोपडा । येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शहीद जवान ह्या विषयावर आधारित नाटीका तसेच बाळ शिवाजी जन्मोत्सव प्रसंगावर आधारित झुलवा पाळणा हे समूह नृत्य सादर करन्यात आले या दोन्ही देखण्याअनोखा ,राष्ट्रभक्तीवर आधारीत सोहळ्याने हजारो विद्यार्थ्यांसह संस्थेच्या पदाधिकार्यांचेही डोळे पाणावले यात शहीद जवान या नाटिकेत रक्षाबंधनासाठीसुटीवर आलेल्या जवान हा रक्षाबंधन पेक्षा देशसेवेला महत्व देतो ,आणि त्या जवानास युद्धात वीरमरण येते त्या नंतर ह्या शहीद जवानाच्या पार्थिव ला विद्यालयातील शिक्षक बी एम पाटील हे पुष्पचक्र वाहून श्रधांजली वाहतात,तसेच मानवंदना देऊन नाटिकेचा समारोप केला जातो असा देखणा प्रसंग विद्यार्थ्यांनी विद्यालयात नाटिकेद्वारा सादर करण्यात आला नाटिकेत यश पाटील, अमोल पाटील, प्रथमेश पावरा, तेजल पाटील, मेघना पाटील, योगेश्वरी चौधरी, राकेश राजपूत या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. याकामी एन.आर.पाटील, जी.एस. सनेर, मनीषा पाटील, रुची शाह या शिक्षकांनी परिश्रम घेतले होते. यावेळी कस्तुरबा महिला समाजाच्या सचिव डॉ. स्मिताताई पाटील, उपाध्यक्षा आशाताई पाटील, गोदावरी ताई देशमुख, समनव्यक डी.एम.साळुंखे, मुख्याध्यापक आर.डी.साठे, एल.एच. अहिरे आदी उपस्थित होते संचलन व्ही.पी. पाटील यांनी केले.