देशभरात व्यापार्‍यांची 50 कोटी रुपयांत फसवूणक ; कर्नाटकातील टोळीचा जळगाव पोलिसांकडून पर्दाफाश

0

जळगावच्या दाखल गुन्ह्यात एक अटकेत इतर फरार ः एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव– देशभरातील भाजीपाला व्यापार्‍याचा विश्‍वास संपादन करुन त्यांची कोट्यवधी रुपयांत फसवणूक करणार्‍या कनार्टक राज्यातील टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एकाच कुटुंबातील असलेल्या या टोळीतील मोहम्मद एजाज ईस्माईल रा. भटकल जि. कारवार (कर्नाटक) यास पोलिसांनी अटक केली आहे. टोळीचा म्होरक्या व अटकेतील एजाजचा भाऊ याच्यासह इतर फरार झाले आहे. जळगावातील शब्बीर खान यांनाही संबंधितांनी 35 लाखांचा गंडा घातला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संबंधित टोळीने रबा ट्रेडर्सच्या नावाने देशभरातील अनेक व्यापार्‍यांची 40 ते 50 कोटीत रुपयांत फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीत त्यांच्याकडून अनेक गुन्ह्याची माहिती समोर येणार आहे.

पाच वर्षात व्यापार्‍याचा विश्‍वास संपादन केला

शनिपेठ परिसरात व्यापारी शब्बीर अब्दुला खान वय 65 हे पत्नी व मुले या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. गेल्या 25 वर्षापासून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आडत व कनिशन एजरंट याच्याकडून कांदे, लसून खरेदी करुन ते विक्री करण्याचा ते व्यापार करत आहेत. 2014 मध्ये खाने कनार्टक राज्यातील भटकल येथील रबा ट्रेडर्सचे मोहम्मद एजाज ईस्माईल भिस्ती, मोहम्मद शफिक ईस्माईल भिस्ती याच्यासह त्याच्या पत्नी व भागीदारांच्या संपर्कात आले. खान यांचे संबंधितांशी व्यापारी संबंतध होते. या पाच वर्षाच्या काळात अनेकदा खान यांनी भिस्ती या माल पाठविला. व त्याचे पैसेही वेळेवर मिळाले.

10 ट्रक कांदा मागवून 35 लाखात फसवणूक

2017 मध्ये मो.शफीक भिस्ती यांनी खान यांना फोनवरुन बाहेर देशात माल पाठवायचा असून नोव्हेंबरपर्यंत 10 ट्रक कांदा पाठविण्यास सांगितले. आजपर्यंच्या विश्‍वासावर खान यांनी जळगावातील इतरांकडून कांदा खरेदी करुन कधी 15 टन, कधी 16 असे वेेगवेगळ्या दिवशी इंडिया रोडलाईन्सच्या ट्रान्सपोर्टने एकूण 35 लाख 11 हजार 893 रुपये किमतीचा 63 टन कांदा पाठविला. पाठविलेल्या मालाचे पैसे मागितले असता, भिस्ती यांच्यासह त्यांचे भागिदार यांनी आज देतो, उद्या देतो, असे म्हणत पैसे देण्यास टाळाटाळ केली. यानंतर एकदा कोरा चेक पाठवून दिला. खान यांनी थेट बँगलोर गाठून संबधितांची भेट घेतली असता, पैसे न देता संबंधितांनी खान यांना तुझ्या मालाची परस्पर विल्हेवाट लावली, तुला पैसे देणार नाही, तुझ्याने जे होत असेल ते करुन घेणे या भाषेत शिवीगाळ करुन दमदाटी केली. यानंतरही अनेकदा खान यांनी त्याच्यांशी मध्यस्थीमार्फत संपर्क साधला. मात्र भिस्ती यांच्या टोळीने खान याचे 35 लाखांपैकी दमडीही दिली नाही.

काद्यांने व्यापार्‍याला रडविले ; घरदार लागले विकावे

शब्बीर खान यांनी इतरांकडून उधारीवर 10 ट्रक कांदा घेतला होता. मात्र त्याचे पैसे न दिल्याने संबंधितांनी तगादा लावला. फसवणूक झाल्यामुळे खान यांना कोणीच उधार माल देत नव्हते. इतरांचे पैसे देण्यासाठी खान यांना जळगावातील घरदार विकावे लागले. यानंतर संबंधितांचे पैसे दिले. यानंतर कर्जबाजारी झाल्याने रोजगाराासठी खान पुण्याला निघून गेले. याठिकाणी त्यांचा मुलगा रिक्षा चालवून उदरनिर्वाह भागवित होता. यात एकेदिवशी पुण्यातील एका सुज्ञ माणसाने खान यांच्यासोबत प्रकार एैकून त्यांना पोलिसात तक्रार देण्याची बुध्दी दिली. त्यानुसार खान यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावेळी आपबिती कथन करतांना खान यांना रडू कोसळले होते. ज्या कांद्यावर उदरनिर्वाह केला. त्याच कांद्याने त्यांना रडविले.

जळगाव पोलिसांनी समोर आणला टोळीचा खरा चेहरा

पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांनी खान यांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेवनू, गुन्हा दाखल करुन घेतला. शिरसाठ यांनी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शन घेवून तपासासाठी तपास अधिकारी सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, हेमंत कळसकर, असिम तडवी, इम्रान सैय्यद, यांचे पथक रवाना केले. पथकाची माहिती संशयितांना मिळाल्यानंतर ते फरार झाले होते. पाच दिवसांच्या अथक परिश्रमानंतर खबर्‍यामार्फत टोळीतील मोहम्मद एजाज ईस्माईल हा कर्नाटकातील निर्जन स्थळ असलेल्या जंगलात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने भटकल पोलिसांच्या मदतीने मोहम्मद एजाच्या मुसक्या आवळल्या. त्याला ताब्यात घेवून पथकाने शुक्रवारी रात्री जळगाव गाठले.

नगरच्या व्यापार्‍याचा कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

एमआयडीसी पोलीस ठाण्यात मो.एजाजसह, त्याचा भाऊ मोहम्मद शफिक ईस्माईल, हारुण रशिद, मोहम्मद ईशाद व एक महिला या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. यातील मोहम्मद शफिक ईस्माईल याच्यासह इतर सर्व फरार आहेत. मोहम्मद शफिक हा या मास्टरमाईंड तसेच म्होरक्या आहेत. या टोळीने देशभरात वेगवेगळ्या ठिकाणच्या अनेक व्यापार्‍यांचा विश्‍वास संपादन 40 ते 50 कोटी रुपयांत फसवणूक केल्याची माहिती मिळाली आहे. अशाचप्रकारे टोळीने नगर येथील शांताराम नामक व्यापार्‍याला लाखांचा गंडा घातला. व पैसे दिले नाही. त्यामुळे व्यापार्‍याने कनार्टक गाठले होते. याठिकाणीही टाळाटाळ होत असल्याने व्यापार्‍याने एका लॉजमध्ये टोळीतील एकाला फोन केला. व आत्महत्येची धमकी दिली होती. वेळेत टोळीतील कुणीच न आल्याने व्यापार्‍याने विषप्राशन करुन घेतले होते. यानंतर टोळीतील एकाने संबंधित व्यापार्‍यावर दवाखान्या उपचार करुन पैसे देण्याचे आश्‍वासन देत गावाकडे रवाना केले होते. मात्र यानंतरही संबंधितांनी नगरच्या वापार्‍याचे पैसे दिले नसल्याची माहिती मिळाली आहे.