देशमुख विद्यालयाचे चित्रकला परिक्षेत यश

0

भुसावळ । शासकीय रेखाकला ग्रेड परिक्षेत रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील डी.एस. देशमुख विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला तसेच इंटरमिजिएट ग्रेड परिक्षेचा निकाल 98 टक्के लागला.

15 विद्यार्थ्यांनी अ श्रेणी प्राप्त केली. यात मोहिनी बाऊस्कर, धनश्री कोल्हे, मोहिनी कोलते, भाग्यश्री पाटील, गायत्री पाटील, खुशबू पाटील, माधुरी कोळी, अश्‍विनी सपकाळे, सृष्टी झाल्टे, वृषभ चौधरी, देवेश कोळी, हितेश कोळी, प्रतिक चौधरी, सायली पाटील, प्राजक्ता पाटील या विद्यार्थ्यांनी अ श्रेणी प्राप्त करुन शाळेच्या नावलौकिकात भर घातली. यानिमित्त दि एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आर.आर. पाटील, उपाध्यक्ष नितीन राणे, सचिव दिनेश पाटील, मुख्याध्यापक ए.पी. बाविस्कर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक एस.बी. सपकाळे यांनी मार्गदर्शन केले.