देशहितासाठी आम्ही नव्या सरकार सोबत: कॉंग्रेस

0

नवी दिल्ली: काल संध्याकाळी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यांच्यासोबत ५७ मंत्र्यांनी शपथ घेतली. पंतप्रधान शपथ घेत असताना कॉंग्रेस पक्षाने ट्वीट करत नव्या मंत्रीमंडळाला शुभेच्छा दिल्या आहेत. देश हितासाठी आम्ही नव्या सरकार सोबत काम करण्यास तयार आहोत असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या शपथ विधीला कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला फक्त ५२ जागा मिळाल्या असून, विरोधी पक्षपदासाठी ५५ जागांची आवश्यकता असते. काल राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये काय बोलणी झाली हे अद्याप समोर आले नसून राजकीय क्षेत्रात या भेटीचे तर्क-वितर्क लावले जात आहे.

काल झालेल्या शपथविधी सोहळ्यास देश विदेशातील सुमारे ७ ते ८ हजार पाहुणे उपस्थित होते. ६८ वर्षीय मोदी हे शपथ घेण्यासाठी ज्या वेळी स्टेजवर जात असतांना समर्थकांनी ‘मोदी मोदी’ अशा घोषणा दिल्या.