देशहितासाठी जैन इरिगेशनच्या सहकार्‍यांचे रक्तदान ; 676 बाटल्यांचे संकलन

0

स्व. हिरालालजी जैन यांचा स्मृतीदिन साजरा 

जळगाव – सध्या सीमेवर अतिरेकी कारवाया सुरू आहेत अशा परिस्थितीत जे जखमी सैनिक असतात त्यांना रक्ताची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्याच्यादृष्टीने देशहितासाठी जैन इरिगेशनच्या सहकार्‍यांनी आज रक्तदान केले. यात विक्रमी 676 बाटल्यांचे संकलन करून स्व. हिरालालजी जैन यांच्या स्मृतिंनाही यावेळी अभिवादन करण्यात आले. तसेच शिवतीर्थ मैदानावर 2500 च्या वर गोरगरिबांसाठी अन्नदान करण्यात आले.

जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अविनाश जैन, अभेद्य जैन, अंकुर जैन यांनीही रक्तदान करून हिरालालजी जैन यांना अभिवादन केले. दिवसभर चाललेल्या रक्तदान शिबिरात जैन प्लास्टिक पार्क येथे 345, जैन फूडपार्क येथे 202, बडोदा 30, चित्तूर 37, उदमलपेठ 14, हैदराबाद 30, आणि अलवर येथे 18 अशा एकूण 676 रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी, केशव स्मृति प्रतिष्ठान संचलित स्व. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, जिल्हा रूग्णालय जळगाव या संस्थांनी रक्ताचे संकलन केले.

ग्री पार्क, फूड पार्क, एनर्जी पार्क, डिव्हाईन पार्क व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकार्‍यांनी जैन फूड पार्क येथे रक्तदान केले. जैन फार्मफ्रेश फूडचे संचालक सुनील देशपांडे व पी. व्ही. साने, सुनिल गुप्ता, बालकृष्ण यादव, के. सी. बेंडाळे यांच्याहस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रदीप सांखला, रोशन शहा, पी. एस. नाईक, जी. आर पाटील, डॉ. प्रदीप ठाकरे, एस. बी. ठाकरे, आर. डी. पाटील, बी. एम. खंबायत, भिकेश जोशी, विक्रांत माळी, सुरक्षा विभागाचे सहकारी एम. आर. बंबारगेकर, बीनू स्टिफन, जे. बी. मॅथ्यू उपस्थित होते. तर प्लास्टिक पार्कच्या डेमो बिल्डींगमध्ये झालेल्या रक्तदान शिबीर झाले. केशव स्मृति प्रतिष्ठान संचलित स्व. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीचे डॉ. मकरंद वैदय, पवन ऐपूरे यांच्यासह सहकार्‍यांनी तसेच जिल्हा रूग्णालय आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्‍यांनी रक्तसंकलनासाठी सहकार्य केले.

गोर गरिबांसाठी अन्नदान
जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर हिरालालजी जैन यांच्या स्मृतिदिनी गोर गरिबांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य संघपती दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांच्यासह जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते. सुमारे 2500 जणांनी भोजनाचा लाभ घेतला. या शिवाय बालक आश्रम, अंध शाळा, हरिजन सेवक संघ मुलींचे वसतीगृह, गायत्री मंदीर, बाबा हरदास संघ, जिल्हा बालसुधारगृह आदी ठिकाणी देखील भोजन पाठविले गेले.