नवापुर । देशातील सर्व राजकीय पक्ष नष्ट करुन त्यागी देशभक्ती व योग्य व्यक्तीच्या हाती सत्ता सोपविली पाहिजे. तसेच राष्ट्रपती निवड थेट जनतेतून व्हावी. गोहत्या बंद होईल असा विश्वास आहे असे मत जयगुरुदेव संप्रदायाचे उत्तराधिकारी बाबा उमाकांतजी महाराज यांनी व्यक्त केले. जय गुरुदेव महाराज यांचे आध्यात्मिक उत्त् ाराधिकारी बाबा उमाकांतजी महाराज यांचा येथे संत्संग कार्यक्रम शिवाजी हायस्कुलचा मैदानावर झाला. त्यात ते बोलत होते. उमाकांतजी महाराज यांनी प्रवचन करतांना आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक राष्ट्रीय,शेतकरी आंदोलन आदींबाबत मार्गदर्शन केले.
नैतिक शिक्षणाची गरज : आज नैतिक शिक्षण देण्याची गरज आहे. प्रत्येकांने शाकाहारी झाले पाहिजे. संविधानात योग्य बदल झाले पाहिजेत. शेतकर्यांना पुढे करुन काही समाज विघातक प्रवृती देशात अशांतता पसरवु पाहत आहे. शेतकर्यांनी जागृत असणे गरजेचे आहे. देशव्यापी शेतकरी संपातून शेतकरी राजा बदनाम होऊ नये याची काळजी घ्यावी. संप,तोड फोड,धान्याची नासाडी यामुळे आपलेच नुकसान आहे. राष्ट्रीय संपत्तीची नासाडी करुन शेतकर्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.
गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा
राजकीय मंडळीनी शेतकर्यांच्या संपाबाबत योग्य तो निर्णय घेऊन संप मिटवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणुन घोषित करुन गायीचे हत्या करणार्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जयगुरुदेव संप्रदायाची आहे..या सत्संग कार्यक्रमाचे संयोजन सुनिल कौशिक,नितीन राठोड,आनंद खैरकर,महेंद्र पाटील,प्रविण पाटील, धमेंद्र पाटील,जयेश पिसे,विनोद भोई,अँड नितीन देसाई,विकास चौधरी,विश्वनाथ पाटील, सोनु पाटील, जितेंद्र भावसार,बाबुलाल पाटील आदींनी केले होते.
शेतमालाला योग्य भाव द्या
उपस्थितांकडून शाकाहारी होण्याचा संकल्प करुन घेण्यात आला. ते म्हणाले,की शेती उत्पादनाला योग्य भाव नाही. हमीभाव नसल्याने शेतकर्यांनी संपासारखे हत्यार आज बाहेर काढले. शेतीप्रधान देशात शेतकर्यांची ही अवस्था देशहितासाठी योग्य नाही. यामुळे जगात आपल्या देशाची प्रतिमा मलिन होत .शेती उत्पादनाला हमी भाव नसणे,शिक्षणाचा अभाव बरोजगारी,गरिबी यासह अनेक मुलभुत समस्या आहेत.त्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य ठोस उपाय योजना आमलात आणण्याची गरज असल्याचे सांगितले.