नवी दिल्ली : जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार व इतरांवर २०१६ मधील प्रकरणात देशद्रोहाचे आरोपपत्र दाखल करताना राज्य सरकारची परवानगीच घेतली नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत, न्यायालयाने सर्वांवर आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया तूर्तास पुढे ढकलली. यात दिल्ली पोलिसांना न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. यामुळे कन्हैया कुमारनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. खासगी वृत्तवाहिनीवरील एका प्रसिद्ध कार्यक्रमाचा दाखला देत त्याने देशाचं न्यायालय म्हणजे ‘आप की अदालत’ समजू नका असा टोमणा मारला आहे.
पहले तो चार्जशीट में फ़र्ज़ी कहानी लिखवाने में तीन साल लगा दिए और फिर बिना कानूनी प्रक्रिया पूरी किए कोर्ट पहुँच गए। लगता है देश की अदालत और टीवी वाली 'आप की अदालत' को एक जैसा समझ लिया।
चौकीदार चोर ही नहीं, चम्पक भी है। ????
— Kanhaiya Kumar (@kanhaiyakumar) January 19, 2019
दरम्यान , याप्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यास आवश्यक असलेल्या परवानग्या घेण्यासाठी दिल्ली पोलिसांना ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. आम्ही दहा दिवसांत या परवानग्या आणू असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले होते.