देशाचा महान सांस्कृतिक वारसा जपणे महत्त्वाचे…. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे

उरुळी कांचन: ब्रिटिशांनी परातंत्रातून मुक्त करताना भारत किंवा हिंदुस्थान स्वतंत्र झाला, असे हेतू पुरस्कर केले नाही. कारण त्या पाठीमागे अनेक कुटील डावपेच होते. इंडिपेंडनस नेशन डे इन अगस्ट म्हणजे इंडिया. म्हणून भारतीय स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करताना राष्ट्र अभिमान बाळगावा व नवनिर्मितीचा , नव राष्ट्राचा,ध्यास घ्यावा तसेच भारताची महान परंपरा व वारसा यांची जपणूक करावी ,असे मत जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर येथे भारताच्या सत्त्याहत्तरवा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण व राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी ध्वजारोहण केले . अध्यक्षीय भाषणात ते पुढे म्हणाले की अन्न, अक्षर, आरोग्य व आचरण तसेच अध्यात्म या बाबीवर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे व व्यसनमुक्त राहून शिक्षण घ्यावे, आणि शाळेचे ,देशाचे नाव उज्वल करावे, असे मत व्यक्त केले. मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर सर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.ह्या याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली, तसेच विद्यार्थ्यांची भाषणे झाली. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर सर, संजय कुंजीर, अमोल कुंजीर ,किरण तळले, मनीषा मेमाणे ,लीना धिवार ,लता चव्हाण, स्मिता तोडकरी, दिपाली बोडरे हे सर्व शिक्षक , पालक वर्ग गावकरी बहुसंख्येने उपस्थित होतेउपस्थित होते.