देशाची अखंडता, एकात्मतेची शपथ

0

भुसावळ । संविधान दिनानिमित्त शहर व परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकिय संस्था संघटनांतर्फे देशाची अखंडता व एकात्मतेसाठी संविधानाचे मुल्य जोपासण्याची शपथ घेण्यात आली. यानंतर प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

कारागृहात खासदारांच्या उपस्थितीत कैद्यांनी घेतली शपथ
येथील कारागृहात संविधान दिन साजरा करण्यात आला. खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसंगी कैद्यांना संविधानाचे पालन करण्याची शपथ देण्यात आली. कैद्यांशी संवाद साधताना खासदार खडसे यांनी सांगितले की, संविधानाने प्रत्येक नागरिकांना जीवन जगण्याचा, शिक्षणाचा, विकासाचा हक्क दिला आहे. त्यामुळे संविधानाचे पालन करणे जीवनात आवश्यक आहे. संविधानाच्या तत्वांचे पालन केल्यास देशातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसून देशात शांतता व सुव्यवस्था नांदेल असे प्रतिपादन केले. याप्रसंगी आमदार संजय सावकारे, कारागृह निरीक्षक जितेंद्र माळी, नगरसेवक प्रा. सुनिल नेवे, पालिकेतील भाजपा गटनेते हाजी मुन्ना तेली, अनुप खोब्रागडे आदी उपस्थित होते.

राजीव गांधी वाचनालय
येथील राजीव गांधी वाचनालयात जिल्हा काँग्रेस व महिला काँग्रेस कमेटीतर्फे संविधान दिन साजर करण्यात आला. प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास कल्पना तायडे, भिमराव तायडे, नितीन पटाव, मो. मुन्नवर खान, माजी आमदार निळकंठ फालक, जे.बी. कोटेचा, जगपालसिंग गिल, फक्रुद्दीन बोहरी, राजेंद्र पटेल, आर.जी. चौधरी आदी उपस्थित होते.

भारिपतर्फे संविधान जागर रॅली
भारिप बहुजन महासंघातर्फे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली संविधान रॅली काढण्यात आली. नवशक्ती आर्केड येथून रॅलीची सुरुवात होऊन भारत मेडीकल, मॉर्डन रोड असा प्रवास करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जवळ समारोप करण्यात आला. रॅलीत भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष के.वाय. सुरवाडे, जिल्हा संघटक ए.टी. सुरळकर, सुमंगल अहिरे, दिनेश इखारे, अरुण तायडे, अरुण नरवाडे, संजय सुरळकर, शिवाजीराव टेंभुर्णीकर, महेश तायडे, बाळु शिरतुरे, भिमराव तायडे, प्रभाकर इंगळे, संजय कांडेलकर, प्रकाश सरदार, सचिन बार्‍हे, शांताराम नरवाडे, जयेंद्र मोरे आदी सहभागी झाले होते.

शहर शिवसेना
शिवसेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. उपजिल्हा प्रमुख अ‍ॅड. श्याम गोंदेकर, प्रा.उत्तमराव सुरवाडे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, विभाग प्रमुख उमाकांत शर्मा, मिलिंद कापडे, ज्येष्ठ शिवसैनिक अबरार ठाकरे, राजेश ठाकूर, माजी शहर प्रमुख नामदेव बर्‍हाटे उपस्थित होते.

शहर काँग्रेस कमेटी
शहर काँग्रेस पक्षातर्फे वसंत टॉकीज परिसरात संविधान दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. शहराध्यक्ष रविंद्र निकम यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रसंगी के.बी. काझी, रहिम कुरेशी, मेहबुब गवळी, विवेक नरवाडे, संजय नरवाडे, शहर महिला अध्यक्षा अनिता खरारे आदींनी संविधान दिन व शहिदांना श्रध्दांजली अर्पित करण्यात आली. यानंतर संविधानाचे पठण करण्यात आले.