सावदा। देश बदलविण्याची ताकद युवाशक्तीत असून आज देशातील युवा हा भाजपा सोबत आहे असे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या तालुकास्तरीय मेळाव्यात बोलताना केले पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी संघटन वर्ष निमित्ताने सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पुढे बोलताना त्यांनी भाजपा सरकारने केलेली कामे आपण जनतेपर्यंत पोहचवावी यातून जनसंपर्क वाढवा असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस हि गुंडांची, दादागिरी करणार्यांची पार्टी आहे म्हणून जनतेने त्यांना नकारले, भाजपास मात्र मोठा इतिहास आहे आपले नेते यांनी यासाठी मोठे त्याग केले आहे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण कार्य करावे असे आवाहनही खासदार खडसे यांनी यावेळी उपस्थित युवकांना केले.
मेळाव्यास यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते माजी खासदार गुणवंतराव सरोदे होते, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे -खेवलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हा परिषद सदस्य कैलास सरोदे, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, तालुका अध्यक्ष सुनील पाटील, भाजयुमो तालुका अध्यक्ष पवन चौधरी, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष मनोज सोनार, नगराध्यक्षा अनिता येवले, सावदा शहराध्यक्ष पराग पाटील, रावेर शहराध्यक्ष मनोज श्रावक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद वायकोळे, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील, आदि मान्यवर उपस्थित होते.
योजनांची माहिती पोहचवा
आमदार हरिभाऊ जावळे यांनी भाजयुमो तसेच भाजपा सर्व कार्यकर्त्यांनी पंडित दीनदयाल यांचे विचार अंमलात आणण्याची गरज असल्याचे सांगितले, सरकारने नोट बंदीचा धाडसी निर्णय घेतला पण यामुळे गरीब श्रीमंतातली दरी कमी झाली, राज्य तसेच केंद्र शासनाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले अनेक योजना सुरु केल्या आहेत पण त्या सामन्य जनतेस माहित होत नाही त्या आपण त्यांना माहित करून द्या असे देखील सांगितले, तर जिल्हा बँकच्या अध्यक्ष अॅड. रोहिणी खडसे यांनी सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन जितेंद्र पाटील यानी केले.