देशाच्या अर्थव्यवस्थेला भू-सुरुंग लावण्याचे काम काँग्रेसने केले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली : सत्तेत आल्यानंतर आम्हाला काही दिवसातच समजले की देशाच्या अर्थव्यवस्थेला भू-सुरुंग लावण्याचे काम काँग्रेसने केले आहे. यूपीए सरकारच्या काळातील आर्थिक धोरणांवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेतृत्त्वाखाली असलेल्या सरकारला दोषी ठरवले.आपल्या सरकारने थकीत कर्जदारांना १ रूपयाही कर्ज दिले नाही असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB)चे उद्घाटन केले. त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधत असताना पंतप्रधान मोदींनी यूपीएच्या काळात अर्थव्यवस्थेची काय अवस्था झाली होती याचे खास शैलीत वर्णन केले.आमचे सरकार थकबाकीदारांकडून एक – एक पैसा वसूल करण्याचे काम करते आहे. यूपीएच्या सतेच्या काळात काही बड्या हस्तींना एका फोनवर सहा वर्षांत लाखो कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले.