देशातील आर्थिक बजेटचा फटका शहरातील धान्य मार्केटवर नाहीच

0

जळगाव (रमेश कारंडे) । केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बुधवारी आर्थिक बजेट जाहिर केले. त्याचा आर्थिक फटका अजून तरी बाजारात दिसून आला नाही. येत्या काही दिवसातच धान्य मार्केटमध्ये गहू, हरबरा व तूरदाळची आवक वाढणार आहे. मात्र देशात गव्हाचे उत्पादन कमी असल्यामुळे भावात थोडाफार फरक पडणार असल्याची माहिती व्यापारीवर्गाकडून होत आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे शहरी व ग्रामिण भागातील नागरीक वर्षभरासाठीचा साठा करून ठेवण्याच्या तयारीत आहे. मात्र ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यापासून नोटबंदीचा फटका अजूनही दिसून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आजच्या परीस्थितीतही पैस काढण्यासाठी व घेण्यासाठी रांगालागून आहे.

काही दिवसात बाजारात नवीन गहु, तांदुळ, हरभरा व इतर दाळी येणार आहेत. आज गव्हाचे भाव हे सर्वसामान्यांना न परवडणारे आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस नवीन गव्हाची वाट पाहत आहे. लवकरच गव्हाची अवक वढली तर भाव उतरतील असे व्यापारी वर्गात बोलले जात आहे. परप्रांतातून दिवसाला जवळजवळ 40 ट्रक गव्हाचे येण्याची शक्यता आहे
विशेष म्हणजे देशात तांदुळाचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्यांचेही तांदुळाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. लोकवन, वनफोरसेवन, शरबती, चंदोसी इत्यादी जातीचे गहु बाजारात उपलब्ध असून त्यांची किंमत साधारण प्रतिक्विंटल 2200 रुपयांपासुन ते 3500 रुपयांपर्यंत आहेत. तसेच तुरदाळ 67 ते 77 रुपये प्रतिकिलो प्रमाणात आहे. गेल्या वर्षा पेक्षा चालू वर्षाच्या दाळींना फार कमी किमत मिळत आहे. तेलाचे भावही पंधरा किलो डब्ब्याला 1120 ते 1250 रुपयांपर्यंत आहेत.
अर्थिक बजेट

शहरात सर्वात जास्त खरेदी शरबती जातीच्या गव्हाची होते. मात्र नोटबंदीचा व अर्थिक बजेटचा बाजारावरती कोणताही परिणाम झालेला नाही. सुरूवातीला चार दिवस नोटाबंदीचा प्रभाव जाणवला होता. त्यानंतर परिस्थिती पुर्वपदावर.
– अरविंद मनियार, भुसार विक्रेते

नोटाबंदीमुळे तेलाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. आजच्या दिवसाला तेलाचे भाव पंधरा किलोमागे 100 रुपयांनी वाढलेलेे आहेत. नोटाबंदीमुळे बाजारात कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला दिसत नाही. तर स्वाईप मशिनचा कोणीही जास्तचे चार्जेस देत नाहीत. म्हणुनच तर स्वाईप मशिन ठेवु शकत नाहीत.
-पियुष बियाणी, होलसेल तेल विके्रता

नुकताच झालेला अर्थिक बजेटमुळे खरेदीविक्रीवर कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला नाही. विदेशी खरेदीमुळे तांदुळाचे भाव 10 रुपयांनी वाढलेले आहेत आणि तांदुळाची किंमत भविष्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
– प्रकाश मंधाण, भुसार विक्रेते