नवी दिल्ली । देशातील सामन्य जनतेसाठी भलेही अच्छे दिन आलेले नसले तरी क्रीडापंटूसाठी मात्र लवकरच अच्छे दिन येणार आहे. क्रीडा मंत्रालयाने देशातील क्रीडा विकासाठी खेलो इंडिया या योजनेला अधिक व्यापक स्वरुप देताना 2017-18 ते 2019-20 या कालावधीसाठी 1756 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आखले आहे. देशाचे नवीन क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर खेलो इंडिया या राष्ट्रीय योजनेत करण्यात आलेल्या बदलांची माहिती देताना सांगितले की, मंत्रीमंडळाने देशात क्रीडा विकासासाठी खेलो इंडियातील योजनेतील सुधारणांना मंत्री मंडळाने मान्यता दिली असून त्याकरता कोट्यावधी रुपयांचे अंदाजपत्रक आखण्यात आले आहे. खलो इंडिया योजनेत सांघीक खेळ, टॅलेन्ट हंट, प्रशिक्शण, स्पर्धांचे स्वरुप आणि खेळांसाठी पैशाची तरतूद असे वर्गिकरण करण्यात आले आहे. याशिवाय गुणवान होतकरू खेळाडूंसाठी दिर्घकालीन खेळाडू विकास योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंना आपले कौशल्य आणि स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करुन दाखवण्यासाठी संधी मिळेल.
20 विद्यापिठांमध्ये स्पोर्ट्स हब
भविष्यातील पदक विजेते खेळाडु मिळवण्यासाठी देशातील 20 विद्यापिठांमध्ये स्पोर्ट्स हब तयार करण्यात येणार आहेत. युवकांमधील फिटनेसला प्राथमिकता देण्यासाठी 10 ते 18 वर्ष गटातील 20 कोटी मुलांना या योजनेत आणून त्यांना फिटनेसचा फायदा आणि खेळ खेळण्याची आवश्यकता याबाबत जागरुक केले जाईल. या माध्यमातू विद्यापिठ स्तरावर खेळांना प्रोत्साहन दिले
जाणार आहे.