देशातील नागरिकच माझे सुरक्षा कवच ! : नरेंद्र मोदी

0

कोकराझार: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात रोजगारी वाढत राहिली तर, सहा महिन्यांनी देशातील युवक पंतप्रधान नरेंद्र मोदींना काठ्यांनी चोप देऊन देशाबाहेर काढतील असे वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्यावरून लोकसभेत मोठा गोंधळ झाला होता. त्याला लोकसभेत प्रत्युत्तर दिल्यानंतर मोदींनी आसाममधील कोकराझार येथील सभेत राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आपल्या भाषणात मोदी यांनी देशातील नागरिक माझे सुरक्षा कवच असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही नेते मला काठ्यांनी चोप देण्याच्या गोष्टी करतात. मात्र देशातील माता-भगिनींच्या आशीर्वादामुळे माझा बचाव होईल. आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहात. त्यामुळे माझा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. ज्या व्यक्तीला एवढ्या मोठ्या प्रमाणात माता-भगिनींची सुरक्षा मिळाली, त्याच्यावर कितीही काठ्यांचा मारा झाला तरी त्याच काहीही वाकड होणार नाही, असंही मोदी म्हणाले.

बेरोजगारी वाढत राहिली तर सहा महिन्यांनी देशातील युवक पंतप्रधानांना काठ्यांनी चोप देऊन देशाबाहेर हाकलतील, या राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकारण चांगलेच तापले आहे. शुक्रवारी लोकसभेत यावरून मोठा गदारोळ झाला होता.