डॉ.राजेंद्र फडके ; भुसावळ स्थानकावर डिजिटल डॉलचे अनावरण
भुसावळ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींच्या जन्मदरात वाढ होण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी बचावो, बेटी बढाओ उपक्रम देशभरात राबवला जात असून यापुढे देशातील प्रत्येक स्थानकावर डिजिटल डॉल उपक्रम राबवणार असल्याची ग्वाही बेटी बचावो, बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांनी येथे दिली. त्यांच्या हस्ते भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर शनिवारी डिजिटल डॉलचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सरकारतर्फे सर्वोतोपरी प्रगती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्राची टोके (नाशिक) या बालिकेच्या हस्ते कन्या पूजन करून डिजिटल डॉलचे अनावरण करण्यात आले.
देशातील पहिलाच उपक्रम
माजी मंत्री तथा आमदार संजय सावकारे म्हणाले की, भुसावळ रेल्वे स्थानकावर डिजिटल डॉल हा जिल्ह्यातील नव्हे तर देशातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मनोज बियाणी, पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, अॅड.बोधराज चौधरी, प्रमोद सावकारे, सतीश सपकाळे, किशोर पाटील, देवेंद्र वाणी, पवन बुंदेले, रमाशंकर दुबे, पुरूषोत्तम नारखेडे, प्रा.प्रशांत पाटील, प्रशांत नरवाडे, प्रमोद नेमाडे, परीक्षीत बर्हाटे, गिरीश महाजन, नंदकिशोर बडगुजर, सुमित बर्हाटे, बापू महाजन, निक्की बत्रा, राजू खरारे यांच्यासह रेल्वेचे डीसीएम व्ही.पी.दहाट, स्टेशन अधीक्षक ए.टी.चुडीले आदींची उपस्थिती होती. सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी सूत्रसंचालन केले.