जळगाव । संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पीपीआरएल हाऊसिंग डॉट कॉम हे रिअल इस्टेट क्षेत्रात सेवा देणारे वेबपोर्टल असलेल्या कंपनीने गणेश महोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्ताने राज्यस्तरीय व प्रथमच ऑनलाइन ‘श्री गणेश आरास स्पर्धा-2017’चे आयोजन केले आहे. प्रत्येक वर्षी घर, गाव ते शहरापर्यंत बाप्पाचे पुजन होत असते. यावेळी सार्वजनिक गणेश मंडळे लोकजागर करतांना नवीन समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाची आरास ही गणेशाच्या आगमनात करतात. सध्या जगभरात डिजिटलायझेशनचे युग सुरू असून त्यात सर्व सामान्याला, समाजाला काही संदेश देणारी अशी आदर्श विचारधारा असते. आपल्या मंडळांचे आरास वैशिष्ट्यांचे दर्शनाचा लाभ देश विदेशातील भक्तांना करून देता यावा यासाठी गावपातळी ते मेट्रो शहरापर्यंत ऑनलाइन जनतेच्या मतदानातून विजेत्या मंडळाची निवड होणार आहे.
वेबवर नोंदणी करण्यासाठी सुवर्ण संधी
या स्पर्धेत मेट्रो शहरांसह, जिल्हे, तालुके ते गावांपर्यंत सर्वच गणेश मंडळांना ऑनलाइन स्पर्धेत सशुल्क भाग घेता येणार आहे. 25 लाखांपर्यंतची एकूण 755 बक्षिसे या सोबत जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासाठी 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2017 या कालावधीत गणेश मंडळांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी झझठङकजणडखछॠ.उजच च्या साइटवर व्हीजीट देवून मंडळाचे रजिस्ट्रेशन करता येणार आहे. या संधीत जास्तीत जास्त गणेश मंडळांनी भाग घेण्यासाठी झझठङकजणडखछॠ.उजच ्च्या वेबपोर्टलवर नोंदणी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली असून सर्व स्पर्धेचे नियम अटी व अधिक माहिती वेबपोर्टलवर उपलब्ध असून हेल्पलाइन क्रमांक 9209092091, 9209092093 सुद्धा देण्यात आले आहेत. तर देशात प्रथमच होणार्या या ऑनलाईन राज्यस्तरीय स्पर्धेत म्हणजेच ‘श्री गणेश आरास स्पर्धा-2017’ मध्ये सर्व गणेश मंडळांनी सहभाग घ्यावे व जनतेने ऑनलाइन व्होटींग करावे, असे आवाहन पारख प्लेक्सस रिअल्टी लि. चे मॅनेजींग डायरेक्टर विनय पारख यांनी केले आहे.