देशातील महिला आजही अडचणीत

0

धुळे । महात्मा गांधी यांनी म्हटले होते गावाचा विकास झाला म्हणजे आपोआप देशांचा विकास होईल. गांधीजींचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त भारतात स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली. आपला परिसर स्वच्छ ठेवणे आहे. भारतात आज देखील आपल्या माता, भगिनी उघड्यावर शौचास जातात यामुळे प्रचंड मानसिक अडचणी येत असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत गवळी यांनी व्यक्त केले. राज्यराखीव पोलीस बल यांनी मोराणे गाव दत्तक घेतले आहे. याागावाचा कायाापालट करण्यााचा मानस राज्या राखीव पोलीस दलातील पोलीस अधिकारी कर्मचारी याांनी घेतलेला आहे. या कार्याक्रामाच्या अध्याक्षस्थानावरुन श्री.गवळी बोलत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रविण सोनवणे, उपसरपंच वृषी ठाकरे उपस्थित होते.

संरक्षण मुख्य कर्तव्य
पोलीस खात्याचे मुख्य कर्तव्य जरी गुन्हयाांना प्रतिबंध करणे, घडलेल्या गुन्हयाांची नोंद करणे, त्याचा तपास करणे, न्यायालयात खटला पाठविणे व आरोपींंना शिक्षा घडवून आणणे, कायदा व सव्यवस्था राखण्याचे आहे. तसेच इतर बंदोबस्त, आंदोलने, मोर्च, नक्षलवाद, आतंकवाद ह्या समस्याांना देखील नियामितपणे तोंंड द्यावे लागते व ह्या सर्व गोष्टी हाताळण्याासाठी एक विशेष बल स्थापन केले आहे.

प्रत्येक गटास सुचना
प्रत्येक गटास 1 गाव दत्तक घेणेबाबत सुचित करण्याात आले आहे. त्याअनुषंगाने राज्या राखीव पोलीस बल गटाने मोराणे याागावांची निवड करण्यात आलेली आहे. यानुसार राज्या राखीव पोलीस दलामार्फतीने गाव स्वच्छ ठेवण्यास मदत मिळणार आहे. नियामितपणे गावात स्वच्छता अभियाान राबविण्याात योणार असून सहकार्य करण्याचे आवाहन कण्यात आले आहे. गटातर्फेगावाचा विकासासाठी सर्वतोपरी मदत होणार आहे. या कार्याक्रमासाठी राज्यराखीव पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी, मोराणे गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सरपंच प्रविण सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले तर उपसरपंच वृषी ठाकरे यांनी आभार मानले.

संरक्षणासाठी स्थापन
सद्यस्थितीत महाराष्ट्रात राज्या राखीव पोलीस दलाचे 16 गट असून धुळे गटाची स्थापना एका तुकडीपासून केली. त्यााकाळातील नंदुरबार, अकलकुवा व शहादा इत्यादी परिसरातून चोरी जाणार्‍याा शिसम, सागवान आदी अमुल्य वृक्षांचे जंगलतोडीपासून सरंक्षण करण्यााकरीता या गटाची स्थापना करण्याात आली होती. महाराष्ट्र शासनाने या गटाची निवड करून नविन राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची या ठिकाणीच सुरवात केली आहे.