भुसावळ । येथील नाहाटा महाविद्यालयात भूगोलशास्त्र मंडळातर्फे भूगोल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 16 ते 21 जानेवारी या कालावधित दररोज सकाळी 10.30 वाजता देशातील विविध धर्म, भूगोल आणि सामाजिक सलोखा या विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. सोमवार 16 रोजी कै. उपप्राचार्य सी.सी. कोल्हे स्मृतिदिवस व भूगोल सप्ताह उद्घाटन समारंभ होणार आहे. उद्घाटक म्हणून उपप्राचार्य प्रा.डॉ. ए.डी. गोस्वामी तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. एस.व्ही. पाटील हे असतील.
असेे राहतील व्याख्यानसत्र
या दिवशी भूगोल, शीख धर्मावर भुसावळ गुरुद्वारातील हरदीपसिंग छाबडा आणि गोविंदसिंग यांचे व्याख्याना होईल. 17 रोजी भूगोल, ख्रिश्चन धर्मावर रेव्हरंड स्वप्निल नाशिककर, पास्टर अलायन्स मराठी चर्च तसेच भूगोल, मुस्लिम धर्मावर प्रा. एम.एम. काझी इस्लामिक स्टडीज, एच.जे. थीम महाविद्यालय, जळगाव यांचे व्याख्यान होणार आहे. 18 रोजी भूगोल, हिंदू धर्मावर प्रा. व्ही.व्ही. काटदरे, संचालक आय.एम.आर. महाविद्यालय, जळगाव यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. एम.व्ही. वायकोळे राहतील. याच दिवशी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून पोस्टर आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन केलेले आहे.
आत्मविश्वास वाढविण्यासाठी सेमिनार
19 रोजी भूगोल, पारशी धर्मावर आदिल रुशी कविना व महारुख के. अमरोलीवला तसेच भूगोल, जैन धर्मावर प्रा. ज्योती ओस्वाल संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय यांचे व्याख्यान होणार आहे. 20 जानेवारी रोजी भूगोल, बौध्द धर्म आणि सामाजिक सलोखा या विषयावर धम्मचारी चंद्रवीर, टी.बी. एम.एस. भुसावळ यांचे व्याख्यान होणार असून या प्रसंगी प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य प्रा.बी.एच. बर्हाटे यांची असणार आहे. याच दिवशी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून सेमिनारचे आयोजन केलेले आहे. 21 जानेवारी रोजी भूगोल, धर्म आणि सामाजिक सलोखा या विषयावर विचारवंत प्रा. देवेंद्र इंगळे, मू.जे. महाविद्यालय, जळगाव यांचे व्याख्यान होणार असून याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्या एम.व्ही. वायकोळे या असतील. तसेच भूगोल सप्ताह समारोप आणि बक्षीस समारंभ याच दिवशी होईल. संपूर्ण सप्ताहासाठी विभागप्रमुख प्रा. व्ही.पी. लढे, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. अजय तायडे, प्रा. उषा कोळी, प्रवीण पवार, विद्यार्थी सचिव कुमारी चारु वायकोळे हे परिश्रम घेत आहेत.