देशातील सर्वात उंच तिरंगा महिनाभरात फडकणार

0

पिंपरी-चिंचवड : शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभ उभारणीचे काम निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात युध्दपातळीवर सुरू झालं आहे. रविवारी यासाठी 107 मीटर उंच स्तंभ उभारला गेला. येत्या महिन्याभरात तिरंगा पिंपरी चिंचवड वासियांना फडकताना पहायला मिळणार आहे. स्तंभ उभारणीसाठी मोठमोठ्या के्रेनचा वापर करण्यात आला. दरम्यान, हे काम पाहण्यासाठी औत्सुक्यापोटी मोठी गर्दी झाली होती. या कामासाठी नुकतीच केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे.

देशभरातील तिरंग्याची माहिती
1.अमृतसर (360 फुट)
भारतातील सर्वात उंच ध्वजस्तंभ पाक सीमेवर अटारी या गावात मार्च 2016 रोजी उभारण्यात आला आहे. 120 फुट रुंद व 80 फुट उंच असा तिरंगा अगदी पाकिस्तानमधूनसुद्धा दिसतो. ध्वज उभारणीस पाकिस्तानने आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला होता.
2. कोल्हापूर (303 फुट)
कोल्हापूर, महाराष्ट्र येथील पोलीस मुख्यालयानजीक पोलीस गार्डनमध्ये सुमारे 90 फुट लांबीचा व 60 फुट रुंदीचा हा भारतीय तिरंगा. भारतदेशातील दुसर्‍या क्रमांकाचा मोठा तिरंगा आहे.
3. रांची (293 फुट)
रांचीच्या पहाडी मंदीर परिसरातील हा स्तंभ मार्च 2016 पर्यंत भारतातील दोन नंबरचा उंच स्तंभ होता. स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ 26 जानेवारी व 15 ऑगस्ट रोजी या स्तंभावर तिरंगा फडकावला जातो.
4. हैदराबाद (291 फुट)
तेलंगणा राज्याच्या दुसर्‍या वर्धापनदिनी उभारणी. ऐतिहासिक हुसेनसागर तलावाच्या किनार्‍यावर उभा केलेला हा स्तंभ भारतातला तिसर्‍या क्रमांकाचा उंच स्तंभ. लज्जतदार बिर्याणीसाठी प्रसिध्द असलेल्या हैदराबादची नवीन ओळख करून देणारा हा स्तंभ आहे.
5.रायपुर (269 फुट)
30 एप्रिल 2016 रोजी छत्तीसगडची राजधानी रायपुरमधील तेलीबंधा तलावाच्याकाठी हा स्तंभ उभा करण्यात आला. रायपूरचे मरीन ड्राइव्ह अश्या नावाने ओळखल्या जाणार्‍या या ठिकाणी दोन सेल्फी स्पॉटस तयार करण्यात आले आहेत.
6 पुणे ( 237 फुट)
कात्रज तलावाजवळ 237 फुटाचा ध्वजस्तंभ उभा केला आहे. जो काही काळापर्यंत भारतातला पाचव्या क्रमांकाचा उंच स्तंभ होता.