देशातील सर्वात मोठा थेट विदेशी गुंतवणूक सौदा

0

मुंबई : तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील एस्सार कंपनीला रशियातील सरकारी कंपनी असलेल्या रोसनेफ्टप्रणित कंपन्यांनी १२.९ अरब डॉलरला विकत घेतले आहे. हा सौदा भारतीय चलनानुसार ८३ हजार कोटीचा आहे.

गेल्या वर्षी ब्रिक्स संघटनेच्या परिषदेत या व्यवहाराची घोषणा गोव्यात करण्यात आली होती. एस्सार कंपनीकडे कर्जदारांनी ४५ हजार कोटीची मागणी केली होती. हा व्यवहार थेट गुंतवणुकीचा विचार करता आतापर्यंत सर्वात मोठा आहे. रशियानेही इतकी मोठी गुंतवणूक परदेशांमध्ये केलेली नाही. रोसन्फ्टच्या गटात ऑईल बिडको, त्राफिगरा-युसीपी या कंपन्याही सहभागी आहेत. व्यवहारात एस्सार ऑईलचा वडिनार गुजराथ येथील दोन कोटी टन क्षमता असलेला पेट्रोलियम प्लान्ट, बंदर आणि ३५०० हून अधिक पेट्रोलपंप आहेत. कंपनीचे संचालक प्रशांत रईया यांनी कंपनी बँकांचे कर्ज चुकते करील असे सांगितले.