देशातील 69.8टक्के दुध, दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत एफएसएसएआयच्या मानकांचे उल्लंघन

0

दिल्ली :अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानुसार, (एफएसएसएआय) देशातील 69.8 टक्के दुध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत एफएसएसएआयच्या गुणवत्ता मानकांचे पालन होत नाही. या पदार्थांमध्ये प्रामुख्याने धुण्याचा सोडा, खाण्याचा सोडा, ग्लुकोज, व्हाईट पेंट आणि रिफाइन्ड ऑइल यांसारख्या भेसळयुक्त पदार्थांची भेसळ केली जाते. असे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) नमूद केले आहे. याशिवाय केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानेही एका अहवालात नमूद केले आहे की, एकूण दुध आणि दुग्धजन्य पदार्थांपैकी ८९.२ टक्के उत्पादने हे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात मिश्रित केले जातात.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अलीकडेच भारत सरकारला सल्ला देताना सांगितले होते की, ‘जर दुध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीवर त्वरित उपाययोजना केल्या गेल्या नाही, तर २०२५ पर्यंत भारतातील ८७ टक्के लोक कर्करोगासारख्या गंभीर आजारांमुळे ग्रासलेले असतील.

३१ मार्च २०१८ पर्यंत देशातील दुधाचे उत्पादन प्रतिदिन १४.६८ कोटी लिटर इतके नोंदविले गेले आहे. तर दुधाचा दरडोई वापर हा ४८० ग्रॅम इतका आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये दुधामध्ये भेसळयुक्त पदार्थांचा सर्वाधिक वापर केला जातो. यामध्ये डिटर्जंट, युरिया, स्टार्च, ग्लुकोज आणि ऑरमेरिक सारखे इतर प्रदूषके हे जाणूनबुजून भेसळ करण्यासाठी वापरले जातात. कारण या प्रदूषकांमुळे दुधाचा पातळपणा कमी होतो. तसेच ते अधिक काळ चांगले राहते.