नवी दिल्ली: डाव्या संघटना, तसेच अनेक मुस्लीम संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली होती. देशात आज अनेक ठिकाणी भारत बंदचा प्रभाव दिसून येत आहे. उत्तरप्रदेश मध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच दिल्लीतील १४ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली असून, कर्नाटक, बिहार राज्यात विरोध प्रदर्शन सुरु आहे. नागरिकत्व कायदा सुधारणा कायद्या विरोधात देशातील पूर्वोत्तर राज्यात हिंसाच्रार उफाळून आला आहे. हा कायदा मागे घेण्यासाठी आज अनेक संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे.
दिल्लीतील लाल किला, जामा मशीद, चांदणी चौक आणि विश्वविद्यालयातील प्रवेशद्वार बंद करण्यात आलायचे डीएमआरसीनं ट्विट करत सांगितलं आहे. तसेच जामिया मिलिया इस्लामिया, जसोला विहार, शाहीन बाग आणि मुनिरका स्टेशनांवरही ट्रेन थांबवण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात डावे आणि मुस्लिम संघटनांनी बंगळुरू बंदचं आयोजन केलं होतं. त्यामुळे टाऊन हॉल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बंगळुरूच्या ग्रामीण भागासह राजधानीमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून तीन दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आलं आहे.