देशात आज पासून काय सुरू, काय बंद?

0

नवी दिल्ली – देशभरात आज सोमवारपासून लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. सध्या करोनाग्रस्तांच्या संख्येनुसार, देशात रेड, ऑरेन्ज आणि ग्रीन झोननुसार विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसारच जिल्ह्यांना किती सूट मिळणार हे ठरवण्यात आलेले आहे. ग्रीन झोनमध्ये येणार्‍या जिल्ह्यांना सर्वाधिक सूट मिळणार आहे. तर ऑरेन्ज आणि रेड झोनमध्ये काही प्रमाणात सूट दिली जात आहे.

रेड झोनमध्ये काय बंद असेल?

विमान वाहतूक, ट्रेन, बस, मेट्रो प्रवास पूर्णपणे बंद.
ऑटोरिक्षा आणि टॅक्सी बंद.
सर्व शिक्षण संस्था बंद.
हॉटेल,रेस्टॉरंट्स, चित्रपटगृह, मॉल्स बंद.
धार्मिक ठिकाणे, मोठ्या संभा बंद
सलून, स्पा बंद.

संध्याकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बाहेर पडणे बंद.
६५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती, १० वर्षांहून लहान मुले आणि गर्भवती स्त्रियांना बाहेस पडण्यास बंदी.
जिम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बंद.
ई-कॉमर्सद्वारे जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची खरेदी बंद

रेड झोनमध्ये काय असेल सुरू?

औषधाची दुकाने, क्लिनिक आणि ओपीडी सुरू राहणार.
दारूची दुकाने, पानाची दुकाने, सिगारेटची दुकाने सुरू राहणार.
चार चाकी वाहने सुरू, (मात्र चालका व्यतिरिक्त दोनच व्यक्तींना प्रवासाची मुभा)
दुचाकी वाहने सुरू, (मात्र केवळ चालकालाच परवानगी)
शहरांधील उद्योगधंदे सुरू.
शहरातील बांधकामे सुरू.
शहरी भागातील दुकाने सुरू.
ई-कॉमर्सद्वारे गरजेच्या वस्तू खरेदी करणे सुरू.
खाजगी आणि शासकीय कार्यालये सुरू (३३ टक्के उपस्थिती)
शेतीशी संबंधित कामे सुरू.
बँकांशी संबंधित कामे सुरू.
कुरिअर आणि पोस्ट सुरू.
सामानाच्या वाहतुकीला परवानगी.

ऑरेन्ज झोनमध्ये काय असेल सुरू?

दारूची दुकाने, पानाची दुकाने, सिगारेटची दुकाने सुरू राहणार.
सलून, स्पा सुरू राहणार.
औषधाची दुकाने, क्लिनिक आणि ओपीडी सुरू राहणार.
दारूची दुकाने, पानाची दुकाने, सिगारेटची दुकाने सुरू राहणार.
चार चाकी वाहने सुरू, (मात्र चालका व्यतिरिक्त दोनच व्यक्तींना प्रवासाची मुभा)
दुचाकी वाहने सुरू, (मात्र केवळ चालकाव्यतिरिक्त आणखी एकालाच परवानगी)
शहरांधील उद्योगधंदे सुरू.
शहरातील बांधकामे सुरू.
शहरी भागातील दुकाने सुरू.
ई-कॉमर्सद्वारे गरजेच्या वस्तू खरेदी करणे सुरू.
खाजगी आणि शासकीय कार्यालये (३३ टक्के उपस्थिती)
शेतीशी संबंधित कामे सुरू.
बँकांशी संबंधित कामे सुरू.
कुरिअर आणि पोस्ट सुरू.
सामानाच्या वाहतुकीला परवानगी.

ग्रीन झोनमध्ये काय असेल सुरू?

दारुची दुकाने, पानाची दुकाने, सिगारेटची दुकाने सुरू.
न्हाव्याची दुकाने, सलून, स्पा बंद.
औषधाची दुकाने, दवाखाने, ओपीडी सुरू राहणार
ऑटोरिक्षा आणि टॅक्सी सुरू (१+१)
आंतरजिल्हा बस वाहतूक सुरू (७० टक्के)
दुसर्‍या राज्यांमध्ये जाणार्‍या बसेस सुरू.
ई-कॉमर्सद्वारे जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची खरेदी सुरू.
औषधाची दुकाने, क्लिनिक आणि ओपीडी सुरू राहणार.
दारूची दुकाने, पानाची दुकाने, सिगारेटची दुकाने सुरू राहणार.
चार चाकी वाहने सुरू, (मात्र चालका व्यतिरिक्त दोनच व्यक्तींना प्रवासाची मुभा)
दुचाकी वाहने सुरू, (मात्र केवळ चालकालाच परवानगी)
शहरांधील उद्योगधंदे सुरू.
शहरातील बांधकामे सुरू.
शहरी भागातील दुकाने सुरू.
ई-कॉमर्सद्वारे गरजेच्या वस्तू खरेदी करणे सुरू.
घरगुती मदत सुरू.
खाजगी आणि शासकीय कार्यालये सुरू.
शेतीशी संबंधित कामे सुरू.
बँकांशी संबंधित कामे सुरू.
कुरिअर आणि पोस्ट सुरू.
सामानाच्या वाहतुकीला परवानगी.