अररिया: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमधील अररिया येथे प्रचारसभा घेत आहे. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर निशाना साधला. देशात एकीकडे कॉंग्रेस वोटभक्तीचे राजकारण करत आहे तर दुसरीकडे देशभक्ती आहे. मुंबईत २६/११ चा हल्ला झाला तेंव्हा कॉंग्रेस सरकारने काय केले? असा प्रश्न मोदींनी केला.
कॉंग्रेस सरकारने सैन्यदलाला स्वत: निर्णय घेऊ दिले नाही. पाकिस्तानला शिक्षा देण्याऐवजी कॉंग्रेसने हिंदूंना संपविण्याचा प्रयत्न केला असा घणाघाती आरोप मोदींनी केला.