नवी दिल्ली: जगभरात थैमान घालणाऱ्या भारतातही कहर केला आहे. दररोज ३० हजारापेक्षा अधिक रुग्ण वाढत आहे. मागील २४ तासात ३७ हजार ७२४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असल्याने देशातील कोरोनाबाधितांची संख्या १२ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. २४ तासात ६४८ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. भारतात सध्या करोनाचे ११ लाख ९२ हजार रुग्ण आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील उल्लेखनीय आहे. आतापर्यंत देशातील ६ लाख ५३ हजार ५० रुग्ण बरे झालेले आहेत. सध्या ४ लाख ११ हजार १३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मृतांची संख्या २८ हजार ७३२ इतकी झाली आहे.
भारतात काल २१ जुलैपर्यंत १ कोटी ४७ लाख करोना चाचण्यात करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने ही माहिती दिली आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक चाचण्या करणारा देश म्हणून भारताची नोंद झाली आहे.
सध्या कोरोनाबाधितांचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा अधिक आहे. ते निम्म्याने कमी करून ५ टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट आरोग्य मंत्रालयाने ठेवले आहे.