नवी दिल्ली: कोरोनाने जगभरात कहर माजविला आहे. भारतातही कोरोनाचा थैमान सुरूच आहे. दररोज कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत विक्रमी वाढ होऊन नव्या विक्रमाची नोंद होत आहे. भारतात मागील २४ तासात आत्तापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाखांच्या पार गेला आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल ४० हजार ४२५ नवे करोनाबाधित आढळले आहे. दिवसभरात ६८१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आत्तापर्यंतची विक्रमी नोंद आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या ११ लाख १८ हजार ०४३ वर पोहचली आहे.
दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील उल्लेखनीय आहे. एकूण रुग्णांच्या ६३ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मागील २४ तासांमध्ये २३ हजार ६७२ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत सात लाखांपेक्षा जास्त जणांनी करोनावर मात केली आहे. ३ लाख ९० हजार ४५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत २७ हजार ४९७ जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात रविवारी ९५१८ नवे करोना रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३,१०,४५५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात ११,८५४ बळी गेले असून रविवारी २५८ जणांचा मृत्यू झाला.