नवी दिल्ली-देशातील पाच राज्यात सध्या निवडणुका सुरु आहे. आज राजस्थान व तेलंगणामध्ये मतदान होत आहे. दरम्यान राजस्थानमधील पाली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणारे भाजप उमेदवार ज्ञानचंद पारीख यांच्या घरून ईव्हीएम मशीन मिळाली आहे. यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाना साधत सध्या देशात काय चालले आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
ट्वीटरवरून त्यांनी भाजपवर निशाना साधला आहे.
What is going on in this country? https://t.co/vQsu3OrlNI
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 7, 2018